चीनने हिंद महासागर (Indian Ocean Region) प्रदेशात तब्बल 12 पेक्षाही अधिक अंडरवॉटर ड्रोन (Underwater Drones) सोडून हेरगीरी केल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे चीन वेडा बनून पेढा खातयं की काय असा संशय निर्माण झाला आहे. संपूर्ण जग कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा सामना करत आहे. यात चीनचाही समावेश आहे. चीनमधून या संकटाची सुरुवात झाल्याने चीनबाबत जगाला सहानुभुती आहे. असे असले तरी, कोरोना व्हायरस निपटतानाच चीन इतर देशांवर, त्यांच्या सामुद्री हद्दीत जाऊन टेहळणीही करत आहे. चीनच्या या धोरणाचा सर्वाधिक धोका भारताला आहे. त्यामुळे चीनच्या मनात भारत आणि जगभरातील इतर देशांबद्दल काही कटकारस्थान तर नाही ना, असा सवाल उपस्थित केला जातो आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय आणि तितकेच प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या फोर्ब्स मासिकाने याबाबत वृत्त दिले आहे.
फोर्ब्स मासिकाने दिलेल्या वृत्तात दावा केला आहे की, डिसेंबर आणि फेब्रुवारी या कालावधीत चीनने हिंद महासागरात सुमारे एक डजनाहून अधिक म्हणजेच 12 पेक्षाही जास्त अंडरवॉटर ड्रोन तौनात केले होते. हे सर्व ड्रोन चीनच्या शियानग्यानघोंघ जहाजाच्या माध्यमातून सोडण्यात आले होते. हो जहाज समुद्राची खोली (ओसयिनोग्राफी), तापमान, टर्पेडिटी आणि ऑक्सीजन आदी गोष्टींचा शोध घेते. वृत्तानुसार, चीनने या ड्रोनच्या माध्यमातून तीन हजारपेक्षाही अधिक निरिक्षणं नोंदवली आहेत. (हेही वाचा, भारताला सशस्त्र ड्रोन विकण्यास अमेरिकेची मंजूरी, क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली देण्याचीही ऑफर)
मासिकाने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, चीनने केलेली ही निरिक्षणं ओशियन-रिसर्च कामासाठी वापरण्यात येऊ शकतात. तसेच, सबमरीन-वॉरफेयर आदीसाठीही याचा वापर केला जाऊ शकतो. जेणेकरुन समुद्राची खोली किती आहे. इथे पाणबुडी सोडल्यास ती किती खोल जाऊ शकते. तसेच, गस्त घालणाऱ्या विमानाच्या नजरेपासून ती किती दूर राहू शकते इत्यादी, गोष्टींसाठीही या निरिक्षणांचा वापर होऊ शकतो. भारतीय नौदल प्रमुख एडमिरल करमबीर सिंह यांनी काही महिन्यांपूर्वीच स्पष्ट सांगितले होते की, चीनच्या कोणत्याही युद्धसरव अथवा रिसर्च-वैसेल आदी गोष्टींसाठी भारताच्या एसइझेड म्हणजेच स्पेशल इक्नोमिक झोनमध्ये येऊ दिले जाणार नाही. जी भारताच्या अनेक किनारपट्ट्यांपासून समुद्रात 200 नॉटिकल मैल आतमध्ये आहे. (हेही वाचा, Coronavirus: लॉकडाऊन असतानाही तो तिच्यावर फिदा झाला, मोबाईल नंबर देण्यासाठी ड्रोनचा वापर केला; व्हिडिओ व्हायरल)
भारतीय नौदलातील सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, ते फोर्ब्स मासिकाचे वृत्त आणि विश्वासार्हता यावर प्रश्न उपस्थित करु शकत नाहीत. परंतू, नौदल सातत्याने हिंद महासागरात चीनी रिसर्च शिप ट्रॅक करण्याचे काम करत आहे. यासाठी पी-8 आय लॉन्ग रेंज मॅरीटाईम पेट्रोल एयरक्राफ्टसोबत युद्ध अभ्यासासाठी सहकार्य घेतले जाऊ शकते. (हेही वाचा, एक राऊंड 36 वार: भारत-रशिया S-400 खरेदी करार: काय आहेत वैशिष्ट्ये?)
सूत्रांच्या हवाल्याने टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, 'कोणत्याही वेळी 4 ते 5 चीनी अभ्यासू जहाजं (रिसर्च शिप) हिंद महासागरात तौनात असतात. ती सातत्याने समुद्री अभ्यास करण्यात गुंतलेली असतात. जेणेकरुन समुद्रातील तापमान, खारेपणाची मात्रा आदी तपासत असतात. ही माहिती गोळा करणे नेव्हिगेशन (समुद्र प्रवास) आणि समबमरीन आदींशी संबंधित असते. या माहितीच्या आधारे एखादा देश समुद्री प्रवासासाठी चांगला मार्ग शोधू शकतो.'