Coronavirus: लॉकडाऊन असतानाही तो तिच्यावर फिदा झाला, मोबाईल नंबर देण्यासाठी ड्रोनचा वापर केला; व्हिडिओ व्हायरल
Drone | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटावर मात करण्यासाठी जगभरातील सर्व देश प्रतत्न करत आहेत. कोरोना व्हायरस नियंत्रणासाठी अद्यापत तरी कोणताही उपाय नाही. त्यामुळे हा आजार आटोक्यात ठेवण्यासाठी उपाय एकच. तो म्हणजे नागरिकांनी एकमेकांपासून दूर राहणे. गर्दी टाळणे. सोशल डिस्टन्स. हा सोशल डिस्टन्स राखण्यासठीच जगभरातील देशांनी शहरं, संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, काही महाभाग लॉकडाऊन (Lockdown) असतानाही एकमेकांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवत आहेत. न्यू यॉर्क (New York) येथील ब्रुकलिन (Brooklyn) येथेही असाच एक वेगळा प्रकार पाहायला मिळाला आहे. एका पठ्याने आपला मोबाईल क्रमांक मुलीपर्यंत पोहोचविण्यासाठी चक्क ड्रोनचा (Drone) वापर केला आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सेल्फ क्वारंटाइन असलेल्या ब्रुकलीन येथील एका तरुणाने ड्रोनचा वापर करत एका मुलीला आपला मोबाईल क्रमांक दिला. जेरमी कोहोन असे या महाभागाचे नाव. महाभाग जेरमी कोहेन केवळ ड्रोनद्वारे मोबाईल क्रमांक देऊनच थांबला नाही. त्याने या सर्व उचापतींचा टीकटॉक व्हिडिओही बनवला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, साधारण एक तासानंतर मुलीने त्याला मेसेजही केला. जेरेमी याने हा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. (हेही वाचा, Coronavirus चा फैलाव टाळण्यासाठी Poonam Pandey ने आपल्या बॉयफ्रेंडला 'अशा' पद्धतीने केले Kiss, पाहा व्हायरल फोटो)

ट्विटर हँडलवर व्हिडिओ शेअर करताना जेरेमी याने लिहिले आहे, ''मला विश्वासच नाही बसला की, हे काम खरोखरच झाले. ही एक सत्य घटना आहे.'' हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 389000 लोकांनी लाईक केले आहे. तर 83300 लोकांनी हा व्हिडिओ रिट्विट केला आहे.

ट्विट व्हिडिओ

व्हिडिओत असेही दिसते आहे की, जेरेमीच्या खिडकीबाहेर एक मुलगी नाचताना दिसते. रेरेमी आपल्या बाल्कनित एका मुलीला हात दाखवताना दिसतो आहे. जी समोरच्या घराच्या छतावर आहे. हे पाहून तो तिला ड्रोनच्या मदतीने मोबाईल नंबर पाठवतो. लडकी हसून तो मोबाईल क्रमांक घेते. जेरेमीच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगलेच पसंत केले जात आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 5 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्यावर अनेक लोक प्रतिक्रियाही देत आहेत.