भारतात वाढत असलेल्या कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांची वाढती संख्या विचारात घेता केंद्र सरकारने कोविशील्ड (Covishield) लसीबाबत देशातील राज्य सरकारांना एक पत्र लिहिले आहे. यात पत्रात केंद्र सरकारने म्हटले आहे की, कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोस घेण्यासाठी 4 ते 8 आठवड्यांचा अवधी ठेवण्यात यावा. पहिल्यांदा हेच आंतर 4 ते 6 आठवडे इतका होता. याचा अर्थ राज्य सरकारं केंद्र सरकारच्या नव्या सूचनांनुसार 4 ते 8 आठवड्यांमध्ये कोविशील्ड वॅक्सीन चा दुसरा डोस देऊ शकतात. दरम्यान, या पत्रात असेही म्हटले आहे की, दुसरा डोस 6 ते 8 आठवड्यांदरम्यान दिल्यास तो अधिक प्रभावी ठरु शकतो.
सरकारने म्हटले आहे की, कोविशील्ड ही लस कोरोनाव्हायरस महामारीविरोधात लढण्यासाठी अधिक प्रभावी आहे. देशात कोरोना लसीकरण अभियान (Corona Vaccination Drive) दुसऱ्या टप्प्यात आहे. या टप्प्यात 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या आणि प्रदीर्ग काळ प्रकृती अस्वास्थ्याने ग्रासलेल्या 45 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांन कोरोना लसीकरण केले जात आहे.
नॅशनल टेक्निकल एडवायजरी ग्रुप अँण्ड नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन वॅक्सीन एडमिनिस्टेशन ने दिलेल्या सूचनांनुतर केंद्राने राज्यांना हे पत्र लिहिले आहे. पहिल्यांदा 4 ते 6 आठवड्यांत कोविशील्ड लसीचा दुसरा डोस देण्याबाबत बोलले जात होते. ाता 4 ते 8 आठवड्यांदरम्यान लस देण्याबाबत निश्चिती करण्यात आली आहे. केंद्र सरकारने स्पष्टपणे म्हटले आहे की, दुसरा डोस 8 आठवड्यांच्या कालावधीत द्यायलाच हवा. हे निर्देश केवळ कोविशील्ड लसीबाबत लागू असतील. (हेही वाचा, Coronavirus Vaccine Precautions: कोरोना लस घेण्याअगोदर किंवा नंतर मद्यपान केल्यास होऊ शकतात 'हे' दुष्परिणाम; जाणून घ्या काय आहे वैज्ञानिकांचं मत)
भारता कोरोना विरुद्ध लसीकरण अभियान वेग धारण करत आहे. सरकारकडून प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार आतापर्यंत COVID 19 लसीकरण केलेल्या नागरिकांची संख्या सुमारे 4.36 कोटी इतकी झाली आहे. सरकारने म्हटले आहे की, अंतिम आकड्यांपर्यंत शनिवार ( मार्च 7) सायंकाळी 7 वाजेपर्यंत कोविड 19 लसीकरणादरम्यान 4,36,75,564 इतके डोस देण्यात आले. आकडेवारीनुसार यात 77,63,276 आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, 48,51,260 आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोसही घेतला आहे.