Coronavirus: जगभरातील 44 देशांतील 82,000 नागरिक कोरोना व्हायरस बाधित, सुमारे 2,800 जणांचा मृत्यू
COVID-19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधीत नागरिकांच्या मृत्यूची जगभरातील संख्या जशी वाढत आहे तशीच कोरोना व्हायरस (COVID-19) संक्रमीत नागरिकांचाही संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे 29 नागरिकांचा मृत्यू बुधवारी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्याचा आकडा आता सुमारे 2,800 इतका झाला आहे. चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशन द्वारे ही ताजी आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच जगभरातील तब्बल 44 देशांमध्ये कोरोना व्हायरस धोका पोहोचला आहे. जगभरात 82,000 नागरिक कोरोना व्हायरस बाधित झाल्याचे समजते. गल्फन्यूजने याबाबत वृत्त दिले आहे.

जपानमध्ये कोरोना व्हायरसच्या एका रुग्णामुळे डॉक्टरांनाही धक्का बसला आहे. जपानमधील एका महिलेला कोरोना व्हायरस लागन झाल्याचे निदान झाले. या महिलेवर आवश्यक ते सर्व उपचार केल्यावर महिलेचा आरोग्य चाचणी अहवाल सामान्य आला. त्या महिलेला घरी सोडल्यावर या महिलेची काही काळाने पुन्हा चाचणी घेण्यात आली. या वेळी या महिलेला पुन्हा कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले. या प्रकारमुळे जपानमधील डॉक्टरही हैराण झाले आहेत. दुसऱ्या बाजूला सौदी अरबमध्ये हजसाठी मक्का येथे जाणाऱ्या यात्रेकरुंनाही रोखण्यात आले आहे. या यात्रेकरुंमध्येही कोरोना व्हायरस लागण होण्याची भीती आहे.

पाकिस्तानमध्येही कोरोना व्हायरसच्या दोन प्रकरणांची पुष्टी झाली आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांचे आरोग्य विषयातील विशेष सल्लागार डॉक्टर जफर मिर्जा यांनी ट्विट केले आहे की, पाकिस्तानमध्ये 2 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे पुढे आले आहे. दोन्ही रुग्णांवर योग्य त्या वैद्यकीय मापदंडांचे पालण करत उपचार केले जात आहेत. दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.

ट्विट

जफर मिर्जा यांनी जनतेला घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगितले आहे. दरम्यानच पाकिस्तानातील सिंध प्रांतात एका 22 वर्षी व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे वृत्त आले आहे. (हेही वाचा, Coronavirus: कोरोना व्हायरस जागतिक अर्थव्यवस्थेवर करतोय नकारात्मक परिणाम?)

ट्विट

ब्राझीलच्या अधिकाऱ्यांनी लॅटीन अमेरिकेत कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण सापडल्याच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. इटलीत बुधवारी (26 फेब्रुवारी) कोरोना व्हायरस लागन झालेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे ब्राजिलमध्ये कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आत 12 पोहोचली आहे. इथली कोरोना व्हायरस संक्रमीत रुग्णांची संख्या 374 इतकी आहे.

ट्विट

ट्विट

कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जपानच्या समुद्र किनाऱ्यावर उभ्या असलेल्या डायमंड प्रिन्सेस जहाजात फसलेल्या 119 भारतीयांना एयरलिफ्ट करण्यात आले. एयर इंडियाच्या एका विशेष विमानाने या भारतीयांना आणि 5 विदेशी नागरिकांना दिल्ली विमानतळावर गुरुवारी पाहटे आणण्यात आले. हे पाच नागरिक श्रीलंका, नेपाळ, दक्षिण अफ्रीका आणि पेरु देशातील आहेत.