Chinese Bank Case: देशातील प्रसिद्ध उद्योगपतींमध्ये गणले जाणारे अनिल अंबानी (Anil Ambani) यांची अवस्था सध्या अशी झाली आहे की, आपल्या वकिलांची फी भरण्यासाठी त्यांना दागिने विकावे लागत आहेत. कर्जाच्या बोजाखाली दबले गेलेले उद्योगपती अनिल अंबानी यांना हा दावा युके कोर्टात केला आहे. त्यांनी कोर्टात असे म्हटले आहे की, ते सामान्य जीवन जगत असून फक्त एकाच कारचा वापर करत आहेत. तसेच पुढे त्यांनी असे म्हटले की, यंदाच्या वर्षात जानेवारी ते जून महिन्यादरम्यान, त्यांनी 9,9 कोटी रुपये किंमतीचे दागिने विकले आहेत. त्यामुळे आता त्यांच्याकडे अशा पद्धतीचे काही सामान राहिलेले नाही. त्याचसोबत आलिशान गाड्यांबद्दल त्यांना प्रश्न केला असता त्यांनी उत्तर दिले की, या सर्व मीडियाच्या अफवा असून माझ्याकडे कधीच रॉल्स रॉयस नव्हती. आता फक्त एकाच कारचा वापर करतो.
युके हायकोर्टाने 22 मे, 2020 रोजी अंबानी यांना असे म्हटले होते की, चीन मधील तीन बँकांना 12 जून 2020 पर्यंत 71,69,17,681 डॉलर (जवळजवळ 5,281 कोटी रुपये) कर्जाची रक्कम आणि 50,000 पाउंड (जवळजवळ 7 कोटी रुपये) बेकायदेशीर पद्धतीने खर्च केल्याने द्यावे लागणार आहेत. त्यानंतर 15 जून रोजी इंडस्ट्रिअल अॅन्ड कमर्शिअल बँक ऑफ चायना यांच्या नेतृत्वाखालील चीनी बँकांनी अनिल अंबानी यांच्या संपत्तीचा खुलासा करण्यात यावा अशी मागणी केली.(FCRA Bill 2020: विदेशी योगदान नियमन कायदा दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर, पाहा काय आहे Foreign Contribution (Regulation) Amendment)
29 जून रोजी मास्टर डेविसन यांनी अंबानी यांच्या प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून संपूर्ण जगभरातील त्यांच्या अशा संपत्तीचा खुलासा करण्याचे निर्देशन दिले ज्याची किंमत 1,00,000 लाख डॉलर्स (जवळजवळ 74 लाख रुपये) हून अधिक आहे. तसेच पुढे असे ही म्हटले की, त्यांच्या या संपत्तीमध्ये त्यांची पूर्णपणे भागीदारी असण्यासह ते एखाद्यासह संयुक्त मालक असल्याचे ही पहावे.
या आदेशावर कोर्टाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात अंबानी यांनी असे म्हटले की, रिलायन्स इनोवेंचर्सला 5 अरब रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. पुढे त्यांनी असे ही म्हटले की, रिलायन्स इनोवेंचर्स मध्ये 1.20 कोटी इक्विटी शेअर्सची कोणतीच किंमत नाही आहे. कोर्टात अंबनी यांनी सांगितले की, परिवाराच्या ट्रस्टसह जगभरातील कोणत्याही ट्रस्टमध्ये त्यांचे कोणतेही आर्थिक नाही आहे.(Cyber Crime In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमधील सामान्य कुटुंबातील मुलीच्या खात्यावर जमा झाले 10 कोटी रुपये)
दरम्यान, इंडस्ट्रिअल अॅन्ड कमर्शिअल बँक ऑफ चायना लिमिटेड, चायना डेवलपमेंट बँक आणि एक्जिम बँक ऑफ चायना यांनी अनिल अंबानी यांच्या विरोधात ब्रिटेनच्या कोर्टाचे दरवाजे खटखटवले आहेत. या बँकांचे असे म्हणणे आहे की, अनिल अंबानी यांनी फेब्रुवारी 2012 रोजी एक जुने कर्ज फेडण्यासाठी जवळजवळ 92.5 कोटी डॉलर्सचे कर्ज कथित आणि व्यक्तिगत गॅरंटीचे पालन केले नाही आहे. या प्रकरणी शीर्ष बँकांनी अनिल अंबानी यांच्याकडून 68 कोटी रुपयांची वसूली करण्यात यावी अशी मागणी केली आहे.