कुणी नोकरी देतं का नोकरी? आर्थिक मंदी नोकरीच्या मुळावर; Automobile सेक्टरसह अनेक क्षेत्रात नोकरभरती मंदावली
unemployment in india | (Photo Credits: Pixabay)

Economic Recession In India: मेक इन इंडिया (Make in India), सबका साथ सबका विकास यांसर अनेक घोषणांचा पाऊस पाडत केंद्र सरका राज्यकारभार करत आहे. विविध चर्चासत्रांमधून सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते आणि सरकारचे मंत्री देशाच्या प्रगतीचे गोडवे गात अनेक दावे करत आहेत. असे असले तरी, समोर येणारी आकडेवारी काही भलतेच चित्र दाखवत आहे. प्राप्त आकडेवारीनुसार देशातील बेरोजगारी (Unemployment) स्थिती गेल्या 45 वर्षांच्या इतिहासात प्रथमच इतक्या खालच्या स्तराला गेली आहे. जवळपास प्रत्येक क्षेत्रात नोकरभरती प्रमाण कमालीचे मंदावलेआहे. केअर रेटिंग्ज (Care Ratings) लिमिटेड नावाच्या एका अहवालानुसार बँक, विमा कंपन्या, ऑटो मेकर्स, लॉजिस्टिक्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये नोकरभरती प्रमाण सर्वात कमी आहे. मार्च 2019 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात 1000 कंपन्यांनी दिलेल्या आकडेवारीच्या अहवालानंतर ही बाब पुढे आली आहे.

ब्लूमबर्गने आपल्या एका अहवालात म्हटले आहे की, सर्व्हिस सेक्टर एक असे क्षेत्र आहे. ज्यात नोकरीच्या संधी आणि आपेक्षा सर्वाधिक असतात. नोकर भरती आणि नोकरीच्या संधी याबाबत विचार करता हेच क्षेत्र आघाडीवर असल्याचे दिसते. मार्च तिमाहीत देशाचा सकल राष्ट्रीय उत्पन (Gross Domestic Product) वाढीचा दर हा इतिहासातील निचांकी पातळीला पोहोचला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम देशातील औद्योगिक क्षेत्रावर झाला आहे. त्यामुळे नोकरभरतीचे प्रमाण कमालिचे मंदावले आहे. त्यामुळे सहाजिकच पुढे येत आहे की, देश सध्या आर्थिक संकटात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएप्रणीत भाजप सरकारच्या आर्थिक धोरणांनाही या मंदीचा झटका बसू शकतो. तसेच, कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या मोठ्या प्रमाणावर घटल्यामुळे आणि हातातील नोकऱ्या गेल्यामुळे सामाजिक ताण तणावातही वाढ होत असल्याचे अभ्यासक सांगतात. केअर रेटिंग्जच्या अहवालानुसार मार्च 2017 मध्ये रोजगारात 54 टक्क्यांची वाढ झाली होती. जी मार्च 2018 मध्ये 57 लाखांवर पोहोचली. ही वाढ 6.2 टक्के इतकी होती. (हेही वाचा, Automobile Sector Crisis: 15,000 हजार कामगारांच्या नोकऱ्या गेल्या; 18 महिन्यांत 286 डिलरशिप आउटलेट झाली बंद)

दरम्यान, यंदा हा आकडा 60 लाख इतकाच राहीला आहे. तर, जॉब ग्रोथ साधारण 4.3 टक्के इतकी राहीली. केअर रेटिंग्जच्या अहावालावरुन पडताळायचे तर, सर्व्हिस सेक्टरमध्ये हायरिंग आणि आउटसोर्सिंग वाढले आहे. मात्र, मायनिंग, स्टील आणि लोह यांसारख्या क्षेत्रातील दिग्गज कांपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत भलतीच घट झाली आहे.