Automobile Sector Crisis: केंद्र सरकार जीडीपी (GDP) वाढल्याच्या आणि भारत आर्थिक प्रगतीच्या मार्गावर असल्याच्या गप्पा मारत असताना दुसऱ्या बाजूला मात्र मंदीचा राक्षस पसरताना दिसतो आहे. ऑटो सेक्टर (Automobile Sector) गेले काही दिवस मंदीचा सामना करत आहे. इतका की, यंदाच्या जुलै महिन्यात झालेल्या वाहन विक्रिने गेल्या 19 वर्षांतील निचांकी पातळी गाठली. तर, गेल्या 18 महिन्यांमध्ये संपूर्ण देशात तब्बल 286 वाहन डीलरशिप आउटलेट बंद झाली आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये तब्बल 15,000 हजार कामगारांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. ऑटो क्षेत्रातील मंदी यापुढे अधिक विक्राळ रुप धारण करणार असल्याची भविष्यवाणी करत अनेक अर्थतज्ज्ञ आतापासूनच धोक्याचा इशारा देऊ लागले आहेत. दरम्यान, ऑटो क्षेत्र मंदीचा सामना करत असल्यामुळे आतापर्यंत अनेक कामगारांनी आपली नोकरी गमावली आहे. तर, काहींना वेतन कपातीचा सामना करावा लागत आहे. ही मंदी यापूढेही कायम राहिल्यास अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यता आहे.
अभ्यासकांनी म्हटले आहे की ग्राहकांची मागणी आणि Liquidity Crisis ऑटो सेक्टरमधील अर्थव्यवस्थेवर मोठा परिणामकारक ठरेल. पण ही स्थिती कायम राहीली तर येणारा काळ आणखीच भयानक असेन. ज्याचा परिणाम ऑटो इंडस्ट्रीच्या विकासावर होईल. आजवरचा इतिहास पाहता ऑटो सेक्टरने 2020 पर्यंत BS-6 चा टप्पा गाठणे आपेक्षीत आहे.
सोसाइटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मैन्यूफैक्चर्रस (SIAM) मंगळवारी काही आकडेवारी प्रसिद्ध केली. त्यानुसार, जुलै महिन्यात प्रवासी वाहने व दुचाकींची विक्री यात 19% म्हणजेच 18,25,148 यूनिट्सची घट झाली आहे. त्या आधी डिसेंबर 2000 मध्ये अशी घसरण पाहायला मिळाली होती. त्या वेळी ही घसरण 22% इतकी राहीली होती. ऑटो सेक्टरमधील मंदीला सध्या नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (Non-Banking Financial Company)यांच्यावरील संकट म्हणून ही पाहिले जात आहे. (हेही वाचा, Effects Of Demonetisation: नोटबंदी निर्णयाच्या तडाख्यात 50 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या - अहवाल)
दरम्यान, Liquidity Squeeze आणि ग्राहकांच्या विश्वासात झालेला बदलाला ऑटो सेक्टरमधील मंदीसाठी जबाबदार धरले जात आहे. येत्या काही दिवसांमध्ये ऑटो सेक्टरमध्ये बीएस -6 स्तरावर ट्रांजिशनमुळे ही स्थिती आणखीच बिघडण्याची चिन्हे आहेत. यामाहा मोटर्सने प्रतिक्रिया देताना मांगळवारी म्हटले की, बीएस-6 ट्रांजिशनमुळे दुचाकी वाहनांच्या किमतीत 10 ते 15 टक्क्यांची वाढ होऊ शकते.