आधार कार्ड (Aadhar Card) संबंधित नियमात भारतीय विशिष्ट प्राधिकरणात (UIDAI) बदल करण्यात आले आहेत. या नियामांअंतर्गत व्यावसायिक प्रतिष्ठान यांच्यासाठी प्रत्येक ग्राहकाच्या वेरिफिकेशनसाठी 20 रुपये आणि पैशांच्या देवाण-घेवाणासाठी 50 रुपये युआयडीएआय शुल्क द्यावे लागणार आहेत. या संबंधित युआडीएआय कडून नोटीस जाहीर करण्यात आली आहे. नोटीसच्या मते प्रत्येक ई- केवायसी मधील आधार सेवेसाठी 20 रुपये मोजावे लागणार आहेत. परंतु हे शुल्क टॅक्स फ्री असणार आहे.
या शुल्का संबंधित बिलाचे पैसे 15 दिवसाच्या आतमध्ये भरावे लागणार आहेत. त्यानंतर जरी 15 दिवसानंतर पैसे भरले नाही तर प्रत्येक महिना दीड टक्के व्याज दर भरावा लागणार आहे. त्याचसोबत व्यक्तीच्या आधार कार्डची पडताळणी आणि ई-केवायसी करु शकणार नाही.
यापूर्वी व्यावसायिकांना आधार सुविधा व्यतिरिक्त एका ग्राहकाच्या पडताळणीसाठी कमीतकमी 150-200 रुपये खर्च करावे लागतात. आधार कार्डच्या माध्यमातून पडताळणी करण्यासाठी कंपन्यांना आणि ग्राहकांना सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तर सुप्रीम कोर्टाने आधार कार्ड आणि मतदान कार्ड लिंक करण्याबाबत याचिका फेटाळून लावली आहे.