आधार कार्ड हरवल्यास Re-Print कसे कराल, जाणून घ्या
Aadhar Card (Photo Credits: PTI)

सध्या आधार कार्ड हे देशाचे नागरित्व असल्याची मूळ ओळख दाखवून देते. त्यामुळे प्रत्येक कामासाठी प्रथम आधार कार्ड आहे का असे विचारले जाते. तसेच आधार कार्ड के आता स्मार्टकार्डसारखे सुद्धा बनवता येते. मात्र जर तुमचे आधार कार्ड हरवले असल्यास चिंता करु नका. कारण युआयडीएआय (UIDAI)ने आधार कार्ड हरविल्यान ते पुन्हा प्रिंट (Re-Print) करता येईल अशी सुविधा सुरु करण्यात आली आहे.

UIDAI संकेतस्थळावर ऑर्डर आधार रिप्रिंट(Order Aadhar Re-print) ऑप्शन देण्यात आले आहे. त्याचसोबत आधार कार्डमध्ये काही अपडेट करुन ते पुन्हा प्रिंट करता येणार आहे. परंतु यासाठी काही शुल्क आकारण्यात येणार आहे. फक्त 50 रुपये देऊन तुम्हाला नवीन रिप्रिंट केलेले आधार कार्ड मिळणार आहे. त्यात स्पीड पोस्ट (Speed Post) आणि जीएसटी (GST) चे पैसे आकारण्यात येणार आहे. (हेही वाचा-1 एप्रिल पर्यंत पूर्ण करा 'हे' काम, नाहीतर PAN Card होईल निष्क्रिय)

आधार कार्ड पुन्हा हवे असल्यास मोबाईल क्रमांक रजिस्टर नसल्यास तरीही चालणार आहे. मात्र आधार क्रमांक किंवा वर्चुअल आयडेंटिफिकेशन क्रमांक असणे आवश्यक असणार आहे.त्याचसोबत नॉन-रजिस्टर मोबाईल क्रमांकावर ओटीपी (OTP) क्रमांक मिळवण्याचे ऑप्शन असणार आहे. तसचे रिप्रिंट केलेले आधार कार्ड हे तु्म्हाला 5 दिवसाच्या आतमध्ये मिळू शकणार आहे.