
1 एप्रिल 2019 पर्यंत पॅन कार्ड (PAN Card) संबंधित हे काम न केल्यास तुमचे कार्ड निष्क्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच पॅन कार्ड संबंधित हे काम पूर्ण करण्यासाठी वेळ द्या.
आता पर्यंत जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड (Aadhar Card) सोबत लिंक केले नसेल तर अडचणी येण्याची शक्यता आहे. तर आयकर विभागाच्या नियमांनुसार तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय समजले जाणार आहे. त्यामुळे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक करण्याची मुदत वाढवून दिली असून ती 31 मार्च 2019 पर्यंत केली आहे. यापूर्वी अंतिम तारीख 30 जून 2018 ठेवण्यात आली होती.
तज्ञांच्या सल्ल्यानुसार, जर पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक केले नसेल तर तुम्हाला ऑनलाईन ITR करु शकणार नाहीत. तसेच तुमचे टॅक्स रिफंड मिळण्यासाठी तुम्हाला अडचणी येतील. एवढच नसुन पॅन कार्ड निष्क्रिय होणार आहे.
पॅन कार्ड आधार कार्डसोबत कसे कराल लिंक?
> आयकर विभागाची ऑनलाईन वेबसाईट www.incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर जावे. त्यानंतर डाव्या बाजूला लाल रंगामधील 'लिंक आधार' या ऑप्शनवर निवडावे. जर तुमचे अकाऊंट नसेल तर तुम्हाला प्रथम रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. अकाऊंट सुरु केल्यानंतर निळ्या रंगातील पट्टीमधील सेटिंग प्रोफाईल ऑप्शन निवडा. तेथेच तुम्हाला आधार कार्ड लिंक करण्याचे ऑप्शन दिसेल. त्यानंर आधार कार्ड संबंधित माहिती भरुन लिंक आधार या ऑप्शनवर क्लिक करा.
> मोबाईलच्या माध्यमातूनही तु्म्ही पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक करु शकता. त्यासाठी तुम्हाला आयकर विभाने दिलेल्या 567678 किंवा 56161 या क्रमांकावर एसएमएस (SMS) पाठवून आधार कार्ड लिंक करता येणार आहे.