 
                                                                 Aadhar card update: तुमच्या आधार कार्डवर तुमचे नाव, नंबर, पत्ता काही चुकले असेल किंवा त्यात काही बदल करायचे असेल तर, इकडे लक्ष द्या. बातमी तुमच्या कामाची आहे. यापुढे असा बदल करण्यासाठी तुम्हाला अधिक शुल्क द्यावे लागू शकते. होय, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (Unique Identification Authority Of India) अर्थातच यूआईडीएआईने आधार कार्ड अपडेटबाबत नवे दर नुकतेच जाहीर केले आहेत.
युआयडीआय (UIDAI)ने दिलेल्या माहितीच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्य वृत्तानुसार, यापुढे प्रत्येक बायोमेट्रिक अपडेटसाठी 100 रुपये शुक्ल द्यावे लागणार आहे. याशिवया तुम्हाला जर तुमचे नाव, पत्ता, फोन नंबर बदलायचे असेल तर त्यासाठी 50 रुपये द्यावे लागतील. नवे बदल होण्यापूर्वी या बदलासाठी 25 रुपये आकारले जात. जीएसटीसह हा बदल 30 रुपये खर्चांमध्ये होत असे. याशिवाय ई-केवायसी किंवा ए-4 साईज पेपरवर आधारचे कलर प्रिंड आऊटसाठी ग्राहकास 30 रुपये द्यावे लागतील. दरम्यान, यापेक्षा अधिक शुल्क घेऊन जर कोणी हे बदल करत असेल तर ते बेकायदेशीर असल्याचेही UIDAI स्पष्ट केले आहे. (हेही वाचा, ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्डशी कसे लिंक कराल ?)
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून नागरिकास 12 अंकी एक विशिष्ट क्रमांक दिला जातो. हा क्रमांक म्हणजेच त्या व्यक्तीची ओळख असते. हा क्रमांक एकमेव असतो. एक क्रमांक केवळ एकाच व्यक्तीला दिला जातो. एकाच क्रमांच्या दोन व्यक्ती असू शकत नाही. तशी दक्षता भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण प्राधिकरण हा क्रमांक देताना घेते. हा क्रमांक पूर्ण सुरक्षीत असतो. हा कोड देण्यासाठी एक कार्ड वापरले जाते. त्याला 'आधार कार्ड' म्हटले जाते. तर त्या क्रमांकाला आधार क्रमांक म्हणून ओळखले जाते. हे कार्ड (क्रमांक) त्या प्रत्येक भारतीयाला दिले जाते जो, भारताचा नागरिक आहे. हे कार्ड देताना कोणत्याही प्रकारे जात, धर्म, लिंग आदी गोष्टींबाबत भेदभाव केला जात नाही.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
