ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्डशी कसे लिंक कराल ?
Driving Licence-Aadhar Card Link (Photo: PTI/Pixabay)

मोबाईल सिम कार्ड, बँक अकाऊंट आणि इतर गोष्टींप्रमाणे ड्रायव्हिंग लायसन्सलाही (Driving Licence) आधार कार्ड (Aadhar card) लिंक करणे अनिवार्य होणार आहे. बनावट ड्रायव्हिंग लायसन्सला आळा घालण्यासाठी सरकारने ही योजना आखली आहे. ड्रायव्हिंग लायसन्सला आधार कार्ड लिंक केल्याने व्यक्तीची बायोमेट्रिक माहिती मिळते आणि बनावट ड्रायव्हिंग लायसन्सला लगाम बसतो.

राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस (Regional Transport Office) ड्रायव्हिंग लायसन्स जारी करतात. त्यामुळे काही वेळेस आधार-ड्रायव्हिंग लायसन्स लिंक करण्याची प्रक्रिया काहीशी भिन्न असू शकते.

जाणून घेऊया आधार कार्ड-ड्रायव्हिंग लायसन्सशी कसे लिंक करावे....

# तुमच्या स्टेट ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर जा.

# त्यानंतर Link Aadhaar या ऑप्शनवर क्लिक करा.

# त्यात दिलेल्या मेन्यूमधून ड्रायव्हिंग लायसन्स हा ऑप्शन सिलेक्ट करा.

# त्यात तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाका आणि Get Details या ऑप्शनवर क्लिक करा.

# तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्समधील डिटेल्स नीट तपासून पाहा.

# त्यानंतर तुमचा 12 अंकी आधार नंबर टाका.

# सबमिट बटनावर क्लिक करा.

# त्यानंतर तुमच्या मोबाईलवर वन टाईम पासवर्ड (OTP) येईल.

# OTP टाकून ही प्रक्रिया पूर्ण करा.

या सोप्या स्टेप्सने तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्डशी लिंक करु शकता.