ड्रायव्हिंग लायसन्समध्ये लवकरच होणार 'हे' नवे बदल !
प्रतिकात्मक फोटो (File Photo)

पुढच्या वर्षीपासून देशाभरातील ड्रायव्हिंग लायसन्समध्ये बदल होणार आहेत. पुढच्या जुलै महिन्यापासून देशातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील ड्रायव्हिंग लायसन्स बदलणार आहेत. तसेच नवी गाडी घेणाऱ्या ग्राहकांच्या गाडीचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटही ड्रायव्हिंग लायसन्ससारखंच असणार आहे. तर काय असणार नवे बदल पाहुया....

 

काय होणार बदल?

# ड्रायव्हिंग लायसन्समध्ये सिक्युरिटी फीचर्ससाठी क्यूआर कोडसुद्धा देण्यात येणार आहे.

# आरसी बुकही एटीएम सारखं असणार आहे. या नव्या कार्डाद्वारे ट्रॅफिकसंदर्भातील माहिती तुम्हाला प्राप्त होईल.

# प्रदूषण नियंत्रणाच्या सूचना या कार्डाद्वारे देण्यात येतील.

# सध्या वाहनपरवाना व गाडीची कागदपत्रे (आरसी) छापील कागदावर दिले जात आहेत. मात्र नवा वाहनपरवाना आणि आरसी स्मार्टकार्डमध्ये मायक्रोचिप आणि क्यूआर कोड असेल.

# नव्या वाहन परवान्यात एटीएम आणि मेट्रोसारखे निअर-फिल्ड कम्युनिकेशन (एनएफसी) फीचर देण्यात येणार आहे. या नव्या फिचरमुळे पोलीसांना वाहन आणि वाहनचालकाची माहिती मिळण्यास मदत होईल.

# दिव्यांग चालकांसाठी खास डिझाईन बनवण्यात आलं आहे.