मोबाईल सिम कार्डला आधार जोडणे अनिर्वाय केल्यानंतर केंद्र सरकारने आता ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) आधारशी जोडणे सक्तीचे केले आहे. ही माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) यांनी दिली आहे. ड्रायव्हिंग लायसन्समध्ये लवकरच होणार 'हे' नवे बदल !
बनावट ड्रायव्हिंग लायसन्सला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर बनावट ड्रायव्हिंग लायसन्समुळे अपघात करुन पळून जाणारी दोषी व्यक्ती निर्दोष सुटते. मात्र आधार कार्ड लिंक केल्याने या गोष्टीला लगाम बसेल. बनावट आधार कार्डवर तुम्ही नाव बदलले तरी डोळ्यांची बुबुळे किंवा बोटांचे ठसे बदलू शकत नाही. त्यामुळे बनावट ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकणार नाही, असे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. चुकीच्या दिशेने गाडी चालवल्यास ड्रायव्हिंग लायसन्स कायमस्वरुपी रद्द; RTO चा नवा नियम
यासंदर्भात लवकरच एक कायदा आणून ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्डशी लिंक करणे अनिर्वाय ठरेल, असे प्रसाद यांनी विज्ञान काँग्रेसमधील भाषणात सांगितले.