आता वयाच्या 16 वर्षी मिळणार ड्रायविंग लायसन्स, पण 'या' एका अटीवर!
Driving Licence Representational Image (File Photo)

आता वयाच्या 16 वर्षी तुम्हांला वाहन चालवता येत असल्यास ड्रायविंग लायसन्स काढण्याची संधी मिळणार आहे. देशभरात सध्या अधिकृत ड्रायविंग लायसन्स काढायचे झाल्यास वयाची 18 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्ही आरटीओमध्ये लायसन्ससाठी अर्ज दाखल करू शकता. काही मीडिया रिपोर्टनुसार,  सरकार लवकरच 16 व्या वर्षी लायसन्स देण्यासाठी एक अधिसूचना जारी करणार आहे.

16 व्या वर्षी लायसन्स काढण्यासाठी अट -

लवकरच तरुणांना १६ व्या वर्षी दुचाकी आणि चारचाकी गाडी चालवण्यासाठी अधिकृत परवाना मिळणार आहे. मात्र त्यासाठी वाहनांच्या वेगावर आणि गाडीच्या पॉवरवर काही बंधन घालण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार , 16 व्या वर्षी गाडी चालवू इच्छिणारे विशिष्ट मर्यादेपेक्षा अधिक वेगाने गाडी चालवू शकत नाही तसेच दुचाकी देखील 50 सीसी पॉवरपेक्षा अधिक असू नये अशी बंधन असतील.

देशात तब्बल 20 लाख अल्पवयीन तरुण मंडळी ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय गाडी चालवत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सरकार हा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे. लवकरच सरकारकडून 50 सीसी पॉवरची, इलेक्ट्रिकवर चालणारी दुचाकी बाजारात आणली जाणार आहे.