आर्थिक वर्ष 2021-22 (Financial Year 2021-22) चा अर्थसंकल्प (Budget) सादर होण्यापूर्वी आजपासून (शुक्रवार, 29 जानेवारी) संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget session of Parliament) सुरुवात होत आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागील वर्षातील देशातील आर्थिक वाटचालीचा अहवाल सादर करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा आजपासून 15 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. तर दुसरा टप्पा 8 मार्च ते 8 एप्रिल या कालावधी पार पडणार आहे. दरम्यान, सध्याच्या देशातील परिस्थितीवरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन नेमकं कसं पार पडणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Union Budget 2021: अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारीला संसदेत मांडणार यंदचा अर्थसंकल्प)
कृषी कायद्यावरुन काँग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूल, आप, अकाली दल, द्रमुक, सीपीआय, माकप, सपा आणि राजद अशा पक्षांनी एकत्रितपणे विरोध दर्शवला आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचारामुळे विरोधकांची भूमिका अधिकच तीव्र झाली आहे. तसंच यात केंद्राची भूमिका नेमकी काय होती याबाबत चौकशीची मागणीही विरोधकांनी केली आहे.
ANI Tweet:
Budget session of Parliament to begin today with President Ram Nath Kovind's Address; Union Budget to be tabled on 1st February. pic.twitter.com/wDAgGxLHFk
— ANI (@ANI) January 29, 2021
विरोधकांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला आहे. यासाठी त्यांनी निवेदन जारी करत आपला विरोध दर्शवला आहे. त्यात त्यांनी असे म्हटले की, केंद्र सरकारने मंजूर केलेले तीन कृषी कायद्यांविरुद्ध देशातील शेतकरी लढत आहे. देशातील 60 टक्के जनता शेतीवर अवलंबून असून हे कायदे कृषी क्षेत्रासाठी धोकादायक आहेत. याविरुद्ध शेतकरी गेले 2 महिने आंदोलन करत आहेत. यात 155 शेतकऱ्यांनी आपले प्राण गमवाले आहेत. यावर केंद्र सरकार शेतकऱ्यांनाच विरोध करताना दिसत आहे आणि त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो.
दरम्यान, यंदाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी संसदेमध्ये सकाळी 11 वाजता सादर करण्यात येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प जाहीर करणार असून कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा अर्थसंकल्प पेपरलेस असणार आहे.