BSNL office. (Photo Credit: Wikimedia Commons)

भाजप खासदार अनंतकुमार हेगडे (BJP MP Anantkumar Hegde) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. हेगडे यांनी सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलच्या (BSNL) कर्मचार्‍यांचा उल्लेख ‘गद्दार’ (Traitors) असा केला आहे. भाजप खासदारांचे म्हणणे आहे की, संकट काळात कंपनीच्या विकासासाठी इथल्या कर्मचाऱ्यांना काम करायचे नाही. ते म्हणाले की, सरकार बीएसएनएलचे खाजगीकरण करेल, त्यासाठी 88 हजार कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले जाईल. कर्नाटकमधील उत्तरा कन्नड जिल्ह्यातील कुमटा येथे सोमवारी झालेल्या कार्यक्रमात हेगडे बोलत होते. या भाजप खासदारांच्या वक्तव्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

या कर्यक्रमात हेगडे म्हणाले की, बीएसएनएलची संपूर्ण यंत्रणा गद्दारांनी भरलेली आहे. मी त्यांचा उल्लेख करण्यासाठी योग्य शब्द वापरत आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात असलेले सरकारही पीएसयूंना भेडसावणाऱ्या अडचणी सोडविण्यास असमर्थ आहे.’ पुढे ते म्हणाले, ‘सरकारने पैसे दिले, लोकांना सेवा हवी आहे आणि पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. पण बीएसएनएल कर्मचार्‍यांना काम करायचे नाही. पंतप्रधान डिजिटल इंडियाबद्दल बोलतात, तंत्रज्ञान आणि निधी प्रदान करतात. परंतु ते लोक काम करण्यास तयार नाहीत. केंद्र सरकार बीएसएनएलचे खाजगीकरण करून कंपनीची दुरुस्ती करेल.’

एएनआय ट्वीट-

वित्तीय वर्ष 2018-19 मध्ये बीएसएनएलचा एकूण महसूल 19,321 कोटी होता, तर त्याचा तोटा 14,904 कोटी रुपये होता. त्यावेळी कंपनीची एकूण मालमत्ता 1.16 लाख कोटी रुपयांच्या जवळपास होती. कंपनीकडे वर्षाकाठी एकूण 1.53 लाख कर्मचारी होते. यापैकी 78,569 कर्मचार्‍यांनी व्हीआरएससाठी अर्ज केले आहेत. ही व्हीआरएस योजना 4 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2019 पर्यंत होती. (हेही वाचा: BSNL ने आणला 147 रुपयांचा नवा प्रीपेड प्लान; सोबतच 'या' दोन प्लान्सची वाढवली वैधता)

दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या पहिल्या कार्यकाळात मंत्री असलेले अनंत हेगडे यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केली आहेत. यावर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांनी राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्या उपवास आणि सत्याग्रहांना नाटक म्हटले होते. यानंतर त्यांना पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या नाराजीचा सामना करावा लागला आणि पक्षाने त्यांना माफी मागण्यास सांगितले.