Poverty | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

भारताने 'तीव्र गरिबी' (Extreme Poverty In India) अधिकृतपणे नष्ट केली आहे, असे अमेरिकन थिंक टँक (American Think Tank) ब्रुकिंग्सने प्रसिद्ध केलेल्या अहवालात (Brookings Report) म्हटले आहे. सुरजित भल्ला आणि करण भसीन यांनी हा अहवाल सादर केला आहे. ज्यामध्ये भारताच्या दारिद्र्य कमी करण्याच्या उल्लेखनीय कामगिरीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. भारताने पाठिमागील दशकात सर्वसमावेशक वाढीच्या उद्देशाने राबवलेल्या धोरणात्मक उपक्रमांना प्राधान्य दिल्यानेच या देशाला हे शक्य झाल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

भारताचा सन 2022-23 साठीचा अद्ययावत उपभोग खर्च डेटा, नुकताच जारी करण्यात आला आहे. जो देशाच्या गिरीबीच्या एकूण क्षितीजावर महत्त्वाचे भाष्य करतो. डेटा हेडकाउंट दारिद्र्य गुणोत्तरामध्ये लक्षणीय घट आणि घरगुती वापरामध्ये लक्षणीय वाढ दर्शवितो. जो अत्यंत गरिबीविरूद्ध देशाच्या यशस्वी लढ्याबद्दल माहिती देतो. अवाहालत म्हटले आहे की, भारताच्या वास्तविक दरडोई वापरामध्ये 2011-12 पासून वार्षिक 2.9% च्या स्थिर वाढीचा दर दिसून आला. ज्यामध्ये शहरी भागाच्या तुलनेत 2.6% च्या तुलनेत ग्रामीण भागात 3.1% जास्त वाढ दिसून आली. शिवाय, शहरी आणि ग्रामीण असमानतेत अभूतपूर्व घसरण झाली, जीनी निर्देशांकात लक्षणीय घट दिसून आली. (हेही वाचा, Poverty Reduction in India: गेल्या 15 वर्षांच्या कालावधीत भारतामधील 41.5 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले; UN ने केले कौतुक)

उल्लेखनीय म्हणजे, 2011 PPP USD 1.9 दारिद्र्य रेषेसाठी मुख्यगणना दारिद्र्य प्रमाण (HCR) 2011-12 मध्ये 12.2% वरून 2022-23 मध्ये फक्त 2% पर्यंत घसरले. ग्रामीण दारिद्र्य दर 2.5% राहिला, तर शहरी दारिद्र्य 1% वर घसरला. PPP USD 3.2 लाइनसाठी, HCR मध्ये 53.6% वरून 20.8% पर्यंत लक्षणीय घट झाली. शौचालये बांधण्यासाठी राष्ट्रीय मिशन, वीज आणि स्वच्छ स्वयंपाक इंधनाची सार्वत्रिक उपलब्धता सुनिश्चित करणे आणि वंचित जिल्ह्यांमध्ये विकास निर्देशकांना चालना देण्याच्या उद्देशाने आकांक्षी जिल्हा कार्यक्रम यासारख्या सरकारच्या नेतृत्वाखालील उपक्रमांचेही या अहवालात कौतुक करण्यात आले आहे. (हेही वाचा, Poverty Report: देशातील 41.5 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले; केंद्र सरकारची मोठी कामगिरी)

अहवालात म्हटले आहे की, भारताचे अत्यंत गरिबीचे यशस्वी निर्मूलन हा त्याच्या सामाजिक-आर्थिक मार्गातील एक महत्त्वाचा क्षण आहे. ज्याचा जागतिक गरिबी निर्देशांकांवर दूरगामी परिणाम होतो. अहवालाचे निष्कर्ष लक्ष्यित धोरणे आणि देशाच्या गरिबीच्या लँडस्केपला पुन्हा आकार देण्यासाठी सर्वसमावेशक वाढीच्या धोरणांचा परिवर्तनात्मक प्रभाव अधोरेखित करतात, असेही या अहवालात म्हटले आहे. एकूणच काय तर भारताच्या दारिद्र्य निर्मूलन मोहीमेला यश आल्याचे हा अहवाल विशेष उल्लेख करु सांगतो. अमेरिकन थिंक टँक ब्रुकिंग्सने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालावर विविध प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.