Bihar Assembly Poll 2020: अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेली बिहार विधानसभा निवडणूक 2020 (Bihar Assembly Elections 2020) अखेर जाहीर झाली आहे. मुख्य निवडणूक आयोगाने ( Election Commission of India) आयोजित पत्रकार परिषदेत शुक्रवारी (25 संप्टेंबर 2020) दुपारी बिहार विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. विधानसभेच्या 243 जागांसाठी ही निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीसाठी 1 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर, 7 नोव्हेंबर, अशा एकूण 3 टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर 10 नोव्हेंबरला मतमोजनी पार पडणार आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाचा धोका टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सींग आणि निवडणूक आयोगाने घालून दिलेली आचारसंहिता (Code of Conduct) यांचे पालन करुन ही निवडणूक पार पडणार आहे.
बिहार विधानसभा निवडणूक कार्यक्रम खालील प्रमाणे
विधानसभा निवडणुकीसाठी तिन टप्प्यात मतदान पार पडणार आहे.
पहिला टप्पा
एकूण 16 जिल्ह्यांमध्ये 71 जागांसाठी मतदान. पहिल्या टप्प्याची अधिसूचना 1 ऑक्टोबरला जारी होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर असेल. तर 28 ऑक्टोबरला पहिल्या टप्प्यासाठी मतदान पार पडेल.
दुसरा टप्पा
17 जिल्ह्यांमध्ये 94 जागांसाठी मतदान. दुसऱ्या टप्प्यासाठी 3 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे.
तिसरा टप्पा
तिसऱ्या टप्प्यात 15 जिल्ह्यांमध्ये 78 जागांसाठी मतदान पार पडेल. या टप्प्यासाठी 7 नोव्हेंबरला मतदान पार पडेल.
निवडणूक इतर कार्यक्रम
- सकाळी 7 ते सायंकळी 6 वाजेपर्यंत होणार मतदान.
- पाच पेक्षा अधिक लोक प्रचारासाठी एकत्र येणार नाही. अन्यता तो अचारसंहितेचा भंग ठरेन.
- मतदानाची वेळ एक तासांनी वाढविण्यात आली.
- मतदान उमेदवारी अर्ज ऑनलाईनही भरता येऊ शकतो.
- 7 लाखांहून अधिक हँड सॅनिटायझर आणि 46 लाखांहून अधिक मास्क उपलब्ध करुन दिले जातील.
- निवडणुकीदरम्यान 1 लाखांहून अधिक पोलीस स्टेशन तैनात असतील.
- व्हर्च्युअल निवडणूक प्रचार करण्यात येईल. मोठमोठ्या सभा, पदयात्रा होणार नाहीत.
दरम्यान, राज्यातील कोरोना व्हायरस संकट विचारात घेता आयोगाने देशभरातील अनेक निवडणुका पुढे ढकलल्या होत्या तर, जाहीर झालेल्या निवडणुकांचे कार्यक्रम स्थगित केले होते. या पार्श्वभूमीवर बिहार विधानसभा निवडणुकीचे काय होणार याबाबत उत्सुकता होती. दरम्यान, आयोगाने ही निवडणूक जाहीर केली. (हेही वाचा, Bihar Assembly Election 2020: बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबावर पोस्टरच्या माध्यमातून निशाणा, 'बिहारवर भार' म्हणून संबोधले)
बिहारमध्ये एकूण 243 विधानसभा जागा आहेत. 243 जागांसाठी 2015 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल युनायटेड यांनी एकत्र येत निवडणूक लढवली होती. त्या वेळी राजद-जदयू या पक्षांच्या महागठबंधनला 178 जागा मिळाल्या होत्या. राजदला 80, जनता दल युनायटेडला 71 आणि काँग्रेस पक्षाला 27 जागा मिळाल्या होत्या. तर उर्वरीत 58 जागा भाजप प्रणित एनडीएच्या वाट्याला आल्या होत्या.
निवडणूक आयोग पत्रकार परिषद
दरम्यान, नीतीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्यात काही मतभेद झाल्यानंतर नितीश कुमार यांचा पक्ष महागठबंधनमधून बाहेर पडला. त्यानंतर नितीश कुमार यांनी संयुक्त्त जनता दल आणि भाजप अशी नवी युती करुन बिहारमध्ये सत्ता मिळवली. विशेष म्हणजे आता विधानसभा निवडणूक 2020 मध्ये नितीश कुमार हे भाजप प्रणित एनडीएचा प्रमुख चेहरा आहेत.
कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी बिहारमधील राजकीय पक्षांनी केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळून लावली आहे. बिहार विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला संपत आहे.