राज्य पातळीवरील सार्वजनिक क्षेत्रात काम करणारी दुसऱ्या क्रमांकाची संस्था म्हणजेच बँक ऑफ बडोदाचे (Bank Of Baroda) नुकतेच विजया बँक (vijaya Bank) व देना बँके (Dena Bank) सोबत विलीनीकरण करण्यात आले. मात्र आता या तीन बँकांच्या कार्यक्षमता वाढवण्याच्या हेतूने काहीच दिवसात तब्बल 800 ते 900 शाखांना टाळं लागण्याची किंवा इतर शाखांमध्ये विलीन करण्याची तयारी सुरु आहे. देना व विजया बँक सोबत बँक ऑफ बडोदाचे विलीनीकरण 1 एप्रिल पासून नव्या आर्थिक वर्षात लागू करण्यात आले होते. 1 एप्रिलपासून बंद होणार या दोन महत्वाच्या बँका; 'बँक ऑफ बडोदा'मध्ये विलीनीकरण
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, तूर्तास पश्चिम व दक्षिण व उत्तर भारतात बँकेची स्थिती मजबूत आहे मात्र पूर्वेकडील राज्यात अजून तितकासा प्रसार झालेला नाही त्यामुळे आताच्या घडीला चालू असलेल्या अनावश्यक प्रादेशिक व क्षेत्रीय शाखा बंद करून येत्या काळात देशाच्या पूर्व भागात विस्तार करण्याची योजना आखण्यात आली आहे.
बँक ऑफ बडोदाचे विलीनीकरण झाल्यावर अनेक ठिकाणी एकाच इमारतीमध्ये तिन्ही बँकांच्या शाखा सुरु असल्याचे आढळून आले. या तीन शाखा एकाच प्रकारचे काम करत असल्याने प्रत्यक्षात त्यांची आवश्यकता नव्हती. यामुळे होणारा अतिरिक्त खर्च रोखण्यासाठीकाही शाखा बंद करण्याचा किंवा अन्य शाखांमध्ये सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता एप्रिल पासून बँकेच्या शाखांचा आढावा घेण्यात येत असल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. त्यानुसार काही शाखांचे अन्य ठिकाणी स्थलांतर किंवा काही शाखा कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहेत. बँक विलीनीकरण झाल्याने ग्राहकांवर परिणाम, या व्यवहारामध्ये होणार बदल
बँक ऑफ बडोदा आर्थिक उलाढालीत दुसऱ्या स्थानी
देना विजया आणि बँक ऑफ बडोदाचं विलीनीकरण झाल्यावर बँक ऑफ बडोदा एकत्रितरित्या देशातील दुसऱ्या क्रमांकाची बँक झाली आहे.सध्याच्या घडीला बँकेच्या जवळपास 9500 शाखा, 13,400 एटीएम आणि 85,000 कर्मचारी देशभरात कार्यरत आहेत. तसेच सुमारे 12 कोटी ग्राहकांच्या सोबत एकूण 15 लाख कोटींचा व्यापार केला जात आहे. याआधी अशा प्रकारचं आर्थिक क्षेत्रातील विलीनीकरण 2017 मध्ये स्टेट बँक, भारतीय महिला बँक आणि पाच असोसिएट बँकांना एकत्र करून झालं होतं.