बँक विलीनीकरण झाल्याने ग्राहकांवर परिणाम, या व्यवहारामध्ये होणार बदल
बँक विलीनीकरण (फोटो सौजन्य- ट्विटर)

सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँक यांचे विलीनीकरण होणार असल्याचा निर्णय डिसेंबर महिन्यात घेण्यात आला होता. या निर्णयावर अखेर 2 जानेवारी रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने यासाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळे तिसऱ्या क्रमवारीत येणारी बँक लवकरच बँकिंग क्षेत्रात येणार आहे. बँकांच्या विलीनीकरणामुळे तिन्ही बँकेच्या ताळेबंदीवर आणि ग्राहकांवर याचा परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे तुमचे खाते या तीन बँकांपैकी एका बँकेत असेल तर तुम्हाला बँकेच्या व्यवहारात हे बदल झालेले दिसून येणार आहेत.

बँकेकडे तपशील सादर करा

ज्या ग्राहकांनी नवे खाते उघडले आहे त्यांनी आयएफएससू क्रमांक आणि त्याबद्दल इतर माहिती थर्ड पार्टी संस्थेमार्फत अपडेट करावे लागणार आहे. तसेच प्राप्तिकर, इन्सुरन्स कंपनी, म्युच्युअल फंड आणि एनपीस यामध्ये बदल होणार आहे.

खाते क्रमांकात बदल होणार

बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँक यांच्या विलीनीकरणामुळे ग्राहकांना नवीन खाते क्रमांक देण्यात येणार आहे. तसेच कस्टमर आयडी ही बँकेकडून सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपला ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक आणि पत्ता बँकेकडे अपडेटेड आहे की नाही याची पडताळणी करुन घ्यावी. यामुळे ग्राहकांना बँकेने नियमात बदल केला असल्याची त्याची योग्य माहिती मिळण्यास मदत होईल.

'ईसीएस' कडे लक्ष राहू द्या

बँकेच्या विलीनीकरणामुळे इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिसेस (ईसीएस) कडे ग्राहकांनी लक्ष द्यावे, तसेच पोस्ट डेटेड चेक क्लिअर करण्याची दखल ग्राहकांनी घ्यावी.

बँकेच्या काही शाखा बंद होणार

विलीनीकरणामुळे बँकेच्या काही शाखा बंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे ग्राहकांना नवीन शाखा चालू झालेल्या ठिकाणी जाऊन बँकेचे व्यवहार करावे लागणार आहे.

( हेही वाचा -Bank strike in 2019: नववर्षात बँक कर्मचारी पुन्हा संपावर; 8,9 जानेवारीला बँक व्यवहार ठप्प!)

त्यामुळे ग्राहकांनी या सर्व गोष्टींची बाब लक्षात घेणे आवश्यक असल्याचे बँकेकडून सांगण्यात येत आहे. तसेच सध्याच्या मुदत ठेवींवर मुदत पूर्ण होईपर्यंत व्याज देण्यात येणार आहे. मात्र व्याजदरात बँकेकडून जोपर्यंत बदल करण्यात येणार नाही तोपर्यंत बँकेच्या व्याजदरात कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचे सांगितले जात आहे.