कोविड-19 ची सौम्य लक्षणे असताना CT Scan टाळा त्यामुळे कॅन्सरचा धोका- AIIMS Chief Randeep Guleria
Dr Randeep Guleria, Director AIIMS (Photo Credits: ANI/Twitter)

कोविड-19 (Covid-19) ची सौम्य लक्षणे असताना CT Scan करणे टाळा असा सल्ला एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया (AIIMS Chief Randeep Guleria) यांनी दिला आहे. त्याचबरोबर कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या कालावधीत स्टिरॉइड्सचा (Steroids) वापर न करण्याचा इशाराही दिला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना गुलेरिया म्हणाले की, "एक सीटी स्कॅन हे छातीचे 300-400 एक्स-रे काढल्यासारखे आहे. त्यामुळे कॅन्सरचा धोका संभावतो." (COVID-19 Vaccine Update: कोविड-19 लस मिळण्यासाठी सर्वसामान्यांना 2022 पर्यंत वाट पाहावी लागेल- AIIMS संचालक डॉ. रणदीप गुलेरिया)

सीटी स्कॅन मशीन संगणकांचा वापर करून आणि एक्स-रे मशीन फिरवत शरीराच्या क्रॉस-सेक्शनल प्रतिमा घेते. तसंच सीटी स्कॅनमध्ये काही पॅचेस दर्शविले जातील मात्र ते कोणत्याही उपचारांशिवाय निघून जातील, असेह ते म्हणाले. त्यांचा उपयोग फुफ्फुसातील न्यूमोनिया किंवा व्हॉईट पॅचेस शोधून कोविड संक्रमण ओळखण्यासाठी केला जात आहे. दरम्यान, अलिकडच्या काळात कोविड चाचण्या अधिक विश्वासार्ह वाटत नसल्याने अनेकजण महागड्या स्कॅनचा आधार घेत आहेत.

Asymptomatic असून कोविड पॉझिटिव्ह असलेले जळवपास 30-40 टक्के लोक CT scan करत आहेत, असे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. त्यांच्यामध्ये ही काही पॅचेस होते परंतु, उपचाराअभावी ते बरे झाले, असे गुलेरिया यांनी सांगितले. तसंच संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात CT scan करणे फारसे फायदेशीर ठरणार नाही. त्यामुळे कोविडचे निदान योग्यरित्या होणार नाही, असेही ते म्हणाले.

Biomarkers याचा उपयोग शरीरात उपचारांचा किती चांगला प्रतिसाद मिळत आहे, हे तपासण्यासाठी केला जातो. गुलेरिया म्हणाले, सौम्य लक्षणे असताना कोविड पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीला रक्तचाचणी करण्याची गरज नाही. biomarkers हे हानिकारक असून CT scan करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला तरच करा. तसंच कोविडच्या सुरुवातीच्या काळात heavy steroids न घेण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

सौम्य लक्षणे असलेले साध्या औषधांनी बरो होऊ शकतील. त्यामुळे केवळ अधिक इंजेक्शन झाल्यानंतरच heavy steroids घेण्याचा सल्ला गुलेरिया यांनी दिला आहे. तसंच रक्त चाचणीमुळे कोविडचे निदान होईल, असे सांगता येत नाही. इतर आजार बायोमार्कर्समध्ये वाढ करु शकतात.

दरम्यान, गुलेरिया हे देशातील टास्क फोर्सचे सदस्य आहेत. ते म्हणाले की, "सौम्य संसर्ग झालेल्यांना रक्त चाचणी करण्याची गरज नाही. Remdesivir, Tocilizumab आणि प्लाझ्मा थेरपी हे केवळ आपात्कालीन वेळेसच करण्याचा सल्ला तज्ञ देतात."