52 Lac Sim Deactivated By Modi Govt: Ashwini Vaishnaw यांच्या हस्ते  Sanchar Saathi Portal  चे उद्घाटन;  मोबाईल फोनचा करता येणार अधिक सुरक्षित वापर
Ashwini Vaishanav | PIB

युजर्सची Safety आणि Security  हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendera Modi)  यांच्या डिजिटल इंडिया संकल्पनेचा अविभाज्य भाग आहे. ही संकल्पना साकार करण्यासाठी केंद्रीय दळणवळण, रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी आज (17 ऑगस्ट) संचार साथी पोर्टलचे (Sanchar Saathi Portal) उद्‌घाटन केले. उद्‌घाटन प्रसंगी बोलताना अश्विनी वैष्णव म्हणाले की, पंतप्रधानांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी आज तीन सुधारणा सादर केल्या जात आहेत.

1. सीईआयआर (सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर) – चोरीला गेलेले/हरवलेले मोबाईल ब्लॉक करण्यासाठी

2. तुमचे मोबाइल कनेक्शन जाणून घ्या – तुमच्या नावावर नोंदणीकृत मोबाइल कनेक्शनबाबत जाणून घेण्यासाठी.

3. एएसटीआर (आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि फेशियल रेकग्निशन पॉवर्ड सोल्यूशन फॉर टेलिकॉम सिम सबस्क्रायबर व्हेरिफिकेशन) – फसवणूक करणारे ग्राहक ओळखण्यासाठी..

मोबाईल फोनचा गैरवापर करून खोटी ओळख दाखवणे तसेच बनावट केवायसी, बँकिंग घोटाळे यांसारखे फसवणुकीचे विविध प्रकार होऊ शकतात. अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे असे ते म्हणाले. दूरसंचार विधेयकाच्या मसुद्यात वापरकर्त्यांची सुरक्षा हा देखील महत्त्वाचा भाग आहे असे ते म्हणाले.

संचार साथी पोर्टलच्या वापराद्वारे , 40 लाखांहून अधिक फसव्या मोबाईल दूरध्वनी कनेक्शनची ओळख पटली असून आतापर्यंत 36 लाखांहून अधिक कनेक्शन रद्द करण्यात आली आहेत.

अश्विनी वैष्णव यांनी वापरकर्त्यांना या पोर्टलला भेट देण्याचे आणि सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. पोर्टलची लिंक (https://sancharsaathi.gov.in) आहे.संचार साथी पोर्टलबाबत संक्षिप्त माहिती पुढे जोडली आहे.

संचार साथी उपक्रमाची थोडक्यात माहिती

117 कोटी मोबाईल दूरध्वनी ग्राहक संख्या असलेली भारत हा जगातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार परिसंस्था म्हणून उदयाला आला आहे. दळणवळणाव्यतिरिक्त, मोबाईल फोनचा वापर बँकिंग, मनोरंजन, ई-शिक्षण , आरोग्यसेवा, सरकारी सेवांचा लाभ घेणे इत्यादींसाठी केला जात आहे.

म्हणूनच ओळख चोरी, बनावट केवायसी, मोबाईल उपकरणांची चोरी, बँकिंग घोटाळे यांसारख्या विविध फसवणुकीपासून वापरकर्त्यांचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे.

वापरकर्त्यांचे संरक्षण करण्यासाठी, दूरसंचार विभागाने संचार साथी नावाचे नागरिक केंद्री पोर्टल विकसित केले आहे. यामुळे नागरिकांना -

त्यांच्या नावावर असलेली नोंदणीकृत कनेक्शन तपासता येतात

फसव्या किंवा अनावश्यक कनेक्शनची तक्रार करता येते

चोरीला गेलेले/हरवलेले मोबाईल फोन ब्लॉक करता येतात

मोबाईल फोन विकत घेण्यापूर्वी IMEI-आंतरराष्ट्रीय मोबाइल उपकरण ओळख क्रमांक संख्येचा खरेपणा तपासता येतो

ही संपूर्ण प्रणाली केंद्रीय दूरसंचार विभागाने स्वतःच तयार केली असून त्यात खालील वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत:

केंद्रीकृत उपकरण ओळख नोंद (सीईआयआर) :

समजा एखादा मोबाईल चोरीला गेला अथवा हरवला तर वापरकर्त्याला त्याच्या मोबाईलचा आयएमईआय क्रमांक या पोर्टलवर नोंदवता येईल.

वापरकर्त्याने सादर केलेली माहिती तसेच पोलिसांकडे केलेल्या तक्रारीच्या प्रतीची सत्यता पडताळण्यात येईल.

ही प्रणाली दूरसंचार सेवा पुरवठादार तसेच कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था यांच्याशी जोडून घेण्यात आली आहे.

सादर केलेल्या माहितीची सत्यता एकदा पडताळून झाली की त्यानंतर ही प्रणाली त्या हरवलेल्या मोबाईलचा भारतीय नेटवर्कमध्ये वापर होण्याला प्रतिबंध करते.

समजा एखाद्याने हा चोरलेला मोबाईल वापरण्याचा प्रयत्न केला तर ही प्रणाली कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना या क्रमांकाचा माग काढण्याची सुविधा उपलब्ध करून देते.

हा चोरलेला मोबाईल फोन परत मिळाला की वापरकर्ता पोर्टलच्या मदतीने या फोनचा वापर पुन्हा सुरु करू शकतो.

ही प्रणाली चोरलेल्या किंवा हरवलेल्या मोबाईल फोनचा वापर होण्यापासून थांबवते.

ही प्रणाली चुकीच्या अथवा बोगस आयएमईआय क्रमांक असलेल्या मोबाईलचा भारतीय नेटवर्कमध्ये वापर होण्यापासून देखील प्रतिबंध करते.

तुमच्या मोबाईलची माहिती करून घ्या

या नव्या पोर्टलमुळे नागरिकांना त्यांच्या मोबाईल फोन्सच्या आयएमईआय क्रमांकांचा अस्सलपणा तपासण्याची सोय झाली आहे.

फसवणुकीच्या प्रतिबंधाचे व्यवस्थापन आणि ग्राहक संरक्षण यासाठी दूरसंचार संदर्भातील विश्लेषण (टीएएफसीओपी)

या प्रणालीद्वारे वापरकर्त्याला कागदपत्रांवर आधारित दस्तावेज वापरुन त्याच्या किंवा तिच्या नावे घेतलेल्या मोबाईल क्रमांकांची संख्या तपासणे शक्य करून देते.

यासाठी वापरकर्त्या व्यक्तीला तिचा मोबाईल क्रमांक या पोर्टलवर नोंदवून ओटीपीच्या सहाय्याने त्याची सत्यता सिद्ध करता येते.

यानंतर ही प्रणाली कागदपत्रांवर आधारित दस्तावेज (आधार क्रमांक, पारपत्रक क्रमांक इत्यादीच्या झेरॉक्स प्रती, इत्यादी) वापरुन त्या व्यक्तीच्या नावे घेतलेल्या मोबाईल क्रमांकांची संख्या दर्शवते.

या प्रणालीच्या मदतीने वापरकर्त्याला फसव्या मोबाईल क्रमांकांची तक्रार दाखल करता येते.

तसेच ही यंत्रणा,वापरकर्त्याला आवश्यकता नसलेल्या क्रमांकांची वापर थांबवण्याची सोय करून देते.

यासाठी वापरकर्त्याने एकदा याबाबत पोर्टलवर मागणी नोंदवली की ही प्रणाली पुनःसत्यापन प्रक्रिया राबवते आणि त्यानंतर हे क्रमांक वापरातून बाद केले जातात.

एएसटीआर ( दूरसंचार सिम ग्राहकाच्या सत्यतेची खात्री करून घेण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता तसेच चेहेऱ्याची ओळख पटवणारी प्रणाली)

खोटे अथवा बनावट दस्तावेज वापरुन मिळवलेले मोबाईल क्रमांक नंतर सायबर गुन्ह्यांसाठी वापरले जातात. हा धोका टाळण्यासाठी केंद्रीय दूरसंचार विभागाने कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाच्या मदतीने एएसटीआर ही प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली बनावट अथवा खोटे दस्तावेज वापरुन मिळवलेले एसआयएम ओळखण्यास मदत करते.

एएसटीआर ही प्रणाली चेहेऱ्याची ओळख पटवणारी तसेच माहितीचे विश्लेषण करणारी विविध तंत्रे वापरते.पहिल्या टप्प्यात, कागदपत्रांवर आधारित केवायसी वापरून घेतलेल्या क्रमांकांचे विश्लेषण करण्यात आले.

एएसटीआरच्या वापरातून मिळालेले यश

  • पहिल्या टप्प्यात,देशभरातील 87 कोटींहून अधिक मोबाईल क्रमांकांचे विश्लेषण करण्यात आले.
  • इतक्या मोठ्या प्रमाणातील माहितीचे विश्लेषण करण्यासाठी परम-सिद्धी महासंगणकाचा वापर करण्यात आला.
  • एकाच छायाचित्राचा वापर करून शेकडो मोबाईल क्रमांक मिळवले आहेत अशा अनेक घटना यातून उघडकीला आल्या.
  • देशभरातील एकूण 40.87 लाख संशयित मोबाईल क्रमांक शोधण्यात आले.
  • योग्य सत्यापन प्रक्रियेच्या आधारे यातील 36.61 मोबाईल क्रमांकांची सेवा याआधीच खंडित करण्यात आली आहे. उर्वरित क्रमांकांवर कारवाई सुरु आहे.
  • सेवा पुरवठादार कंपन्यांकडून अशा प्रकारच्या चुकीच्या पद्धतीने मोबाईल क्रमांकांची विक्री करणाऱ्या एकूण 40,123 विक्री केंद्रांची (पीओएस) नावे काळ्या यादीत टाकण्यात आली असून देशभरात या संदर्भात दीडशे प्रथम माहिती अहवाल नोंदवण्यात आले आहेत.
  • सेवा खंडित केलेल्या मोबाईल क्रमांकांची माहिती बँका, पेमेंट वॉलेट्स तसेच समाज माध्यम मंचांवर सामायिक करण्यात आली आहे जेणेकरून त्यांच्याद्वारे होत असलेले या क्रमांकांशी संबंधित व्यवहार थांबवता येतील