
India Stops Chenab River Water: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानविरुद्ध सातत्याने अनेक कठोर पावले उचलली जात आहेत. भारताने सिंधू पाणी करार स्थगित केला आहे. तसेच आता चिनाब नदीवरील बगलिहार धरणातून (Baglihar Dam) होणारा पाण्याचा प्रवाह थांबवला (India Stops Chenab River Water) आहे. याशिवाय, झेलम नदीवर बांधलेल्या किशनगंगा धरणाबाबतही भारत अशीच पावले उचलण्याची योजना आखत आहे. प्राप्त माहितीनुसार, जम्मूतील रामबन येथील बागलिहार जलविद्युत धरण आणि उत्तर काश्मीरमधील किशनगंगा जलविद्युत धरणामुळे भारताला पाणी सोडण्याच्या वेळेचे नियमन करण्याची क्षमता मिळते.
पीटीआयच्या वृत्तानुसार, भारत कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय बगलिहार (जम्मूमधील रामबन) आणि किशनगंगा (उत्तर काश्मीर) येथे बांधलेल्या जलविद्युत धरणांद्वारे पाकिस्तानकडे जाणारा पाण्याचा प्रवाह वाढवू किंवा कमी करू शकतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला कडक संदेश देण्याच्या भारताच्या रणनीतीचा हा एक भाग असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. (हेही वाचा - Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानच्या नापाक कारवाया सुरुचं! नियंत्रण रेषेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर)
भारताने स्थगित केला सिंधू पाणी करार -
दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दशकांपूर्वीचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. जागतिक बँकेच्या मध्यस्थीने केलेल्या सिंधू जल कराराने 1960 पासून भारत आणि पाकिस्तानमधील सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या वापराचे नियमन केले होते. पाकिस्तानसोबत युद्धे होऊनही भारताने हा करार रद्द केला नाही. मात्र, आता भारताने हे मोठे पाऊल उचलले आहे. (हेही वाचा - Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यातील संशयित कोलंबोला पोहोचले? चेन्नईहून आलेल्या विमानाची श्रीलंका विमानतळावर तपासणी)
बागलिहार धरणावरून दीर्घकाळापासून वाद -
बागलिहार धरण हा दोन्ही शेजाऱ्यांमध्ये बऱ्याच काळापासून वादाचा विषय आहे. या प्रकरणात पाकिस्तानने जागतिक बँकेची मध्यस्थी मागितली आहे. पाकिस्तानची सुमारे 80 टक्के शेती जमीन सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. हे पाणी सिंचन, वीज निर्मिती आणि दैनंदिन गरजांसाठी वापरले जाते.