
Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) सुरक्षा यंत्रणा अतिशय सतर्क झाल्या आहेत. यंत्रणेद्वारे संशयित दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेले सहा संशयित चेन्नईहून विमानाने श्रीलंकेत पोहोचल्याची माहिती भारताकडून मिळाल्यानंतर आज दुपारी कोलंबो विमानतळावर (Colombo's Bandaranaike International Airport) मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवण्यात आली.
श्रीलंकेतील एअरलाइन्सचे विमान UL122 आज सकाळी 11:59 वाजता बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले, जिथे त्याची कसून सुरक्षा तपासणी करण्यात आली. पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, भारतीय अधिकाऱ्यांनी श्रीलंकेला इशारा दिला होता की, पहलगाममधील सहा संशयित विमानात होते. स्थानिक वृत्तानुसार, श्रीलंका पोलिस, श्रीलंका हवाई दल आणि विमानतळ सुरक्षा युनिट्सनी संयुक्तपणे शोध मोहीम राबवली. तथापि, त्यांना कोणताही संशयित आढळला नाही. (हेही वाचा - Pahalgam Terror Attack: 'अल्लाहू अकबर म्हणताच सुरू झाला गोळीबार'; झीपलाईन वर असलेल्या प्रत्यक्षदर्शी ऋषी भट्टचा खळबळजनक दावा, NIA ने झीपलाईन ऑपरेटरला बजावला समन्स (Watch Video))
एअरलाइन्सने जारी केले निवेदन -
श्रीलंकेच्या एअरलाइन्सच्या निवेदनानुसार, विमानाची कसून तपासणी करण्यात आली. यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. निवेदनात म्हटले आहे की चेन्नई एरिया कंट्रोल सेंटरने त्यांना भारतात हवा असलेला एक संशयित असल्याची सूचना दिली होती. (नक्की वाचा: Terrorist Attack in Pahalgam: हल्लेखोरांनी पीएम मोदींची निंदा केली, वडिलांना इस्लामिक श्लोक म्हणायला लावले; पुण्याच्या जखमी संतोष जगदाळे यांंची लेक आसावरी जगदाळे ने सांगितला थरारक प्रसंग. )
दरम्यान, विमानाची सखोल तपासणी केल्यानंतर, पुढील ऑपरेशन्ससाठी परवानगी देण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. तथापि, अनिवार्य सुरक्षा प्रक्रियेमुळे सिंगापूरला जाणारी फ्लाइट UL 308 ला विलंब झाला. आमच्या प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे, असे एअरलाइनने म्हटले आहे.