
पहेलगाम (Pahalgam) दहशतवादी हल्ल्यामधील अंगावर काटा आणणार्या गोष्टी आता समोर येत आहेत. या हल्ल्यामध्ये 54 वर्षीय संतोष जगदाळे देखील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर 3 गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. PTI शी बोलताना संतोष यांच्या 26 वर्षांच्या मुलीने,अअसावरी जगदाळेने सारा प्रसंग सांगितला आहे. हल्ला झाला तेव्हा गोळ्यांचा आवाज ऐकून ते एका झोपडीत लपले होते. हल्लेखोर तेथे आला. त्याने संतोष यांना इस्लामिक मंत्र म्हणायला सांगितले. मात्र संतोष ते बोलू न शकल्याने त्यांच्या डोक्यात आणि कानामागून, पाठीत अशा 3 गोळ्या झाडल्या. संतोष जगदाळे हे पुण्यात व्यावसायिक आहेत.
संतोष जगदाळे खाली पडल्यानंतर त्यांच्या भावावरही हल्ला केला. आसावरीच्या माहितीनुसार ते 5 जण एकत्र होते. मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणार्या पहलगामजवळील बैसरन व्हॅलीमध्ये ते आले होते. दरम्यान आसावरीला अद्याप तिचे वडील आणि काका जिवित आहेत की मृत हे ठाऊक नाही.
अलिकडच्या काळात काश्मीरमध्ये झालेला हा सर्वात भीषण दहशतवादी हल्ला आहे. यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले, त्यापैकी बहुतेक पर्यटक होते. नक्की वाचा: Pahalgam Terror Attack: पहेलगाम च्या दहशतवादी हल्ल्यात दिलीप डिसले, अतुल मोने या महाराष्ट्रातील 2 पर्यटकांचा मृत्यू; 4 पुरूषांवर उपचार सुरु .
आसवरी सोबत तिची आई आणि अन्य एक महिला आहे. सध्या त्या पहलगाम क्लबमध्ये आहेत. स्थानिक आणि सुरक्षा दलांनी त्यांना तेथे पोहचवले आहे. " गोळीबाराचा आवाज ऐकून आम्ही ताबडतोब जवळच्या तंबूत संरक्षणासाठी धावलो. तसेच सहा ते सात इतर पर्यटक देखील गेले. दहशतवादी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या गोळीबारापासून बचाव करण्यासाठी आम्ही सर्वजण जमिनीवर पडलो," असे आसावरीने सांगितले आहे. नक्की वाचा: Pahalgam Terror Attack: 'जा जाऊन मोदींना सांगा' कर्नाटक मधील व्यावसायिकाला ठार मारल्यानंतर त्याच्या पत्नीवर खेकसला हल्लेखोर .
हा गोळीबार 3.30 च्या सुमारास झाल्याचं तिने म्हटलं आहे. आसावरीने प्रतिक्रिया देताना हे हल्लेखोर अन्य सामान्य लोकांप्रमाणेच कपडे घालून आले होते. दहशतवाद्यांनी त्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दिल्याचा आरोप केला, त्यानंतर त्यांनी काही विधाने करून काश्मिरी अतिरेकी निष्पाप लोक, महिला आणि मुलांना मारतात हे नाकारले. असे म्हटलं आहे.