Pahelgam Terror Attack | X

जम्मू कश्मीर च्या पहेलगाम (Pahalgam) मध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यामध्ये 26 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जात आहे. अद्याप अधिकृत आकडा जाहीर करण्यात आला नसला तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मृतांमध्ये महाराष्ट्रातील दोन पुरूषांचा समावेश असल्याची माहिती दिली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार,   दिलीप डिसले आणि डोंबिवलीचे अतुल मोने अशी मृत पर्यटकांची नावं आहेत.  पनवेलचे माणिक पटेल आणि एस. भालचंद्रराव हे दोन पर्यटक जखमी झाले आहेत. सोबतच पुण्याचे संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे हे जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे. नक्की वाचा: Pahalgam Terror Attack: 'जा जाऊन मोदींना सांगा' कर्नाटक मधील व्यावसायिकाला ठार मारल्यानंतर त्याच्या पत्नीवर खेकसला हल्लेखोर .

मुरलीधर मोहोळ पुण्यातील पर्यटकांच्या संपर्कात

 

View this post on Instagram

 

A post shared by Murlidhar Mohol (@murlidharkmohol)

 

मुरलीधर मोहोळ यांनी  संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे दोन्ही जखमींवर योग्य ते उपचार सुरु असून त्यांना सर्वतोपरी मदत पोहोचविली जाईल. शिवाय प्रशासनाच्या मी स्वतः संपर्कात असून योग्य ती मदत आणि वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यासंबंधित चर्चा झाली आहे. अशी माहिती दिली आहे. दरम्यान या दोन्ही कुटुंबातील महिला सुरक्षित आहेत. त्यांना परत आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील X वर पोस्ट करत मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याकडे जखमींना योग्य उपचार मिळावेत यासाठी विनंती केली होती.