Karnataka Businessman Manjunath Rao’s Wife Pallavi Shares Horror Story (Photo Credits: X/@TSKUPid)

पहेलगाम मध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जात आहे. सोशल मीडीयातून समोर आलेल्या व्हिडिओ मधून घटनास्थळी दाखल असलेल्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही मुस्लिम आहात का? असं विचारून हिंदूंवर धडाधड गोळ्या झाडून पर्यटकांना ठार मारलं. पहेलगाम मध्ये मंजुनाथ या कर्नाटकातील एका व्यावसायिकाची हत्या झाली आहे. मंजुनाथच्या पत्नीने घडला प्रकार सांगितला. तेव्हा आपल्या पतीच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. पल्लवी या मंजूनाथच्या पत्नी आणि त्यांचा 18 वर्षांचा मुलगा देखील तेथेच होता.

पल्लवी यांच्या समोर पतीला गोळ्या झाडल्यानंतर त्यांनी 3-4 हल्लेखोरांपैकी एका जवळ जाऊन जर माझ्या पतीला मारलं तर मलाही ठार करं असं म्हटलं तेव्हा त्यांनी तुला मारणार नाही. जा जाऊन सारा प्रकार तुमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाऊन सांगा. असं म्हटलं. पल्लवीच्या मुलानेही मला ठार कर असं म्हटलं तेव्हा त्यालाही हल्लेखोरांनी हात लावला नसल्याचं मीडीयाशी बोलताना सांगितलं आहे.

पल्लवीने दिलेल्या माहितीनुसार, पहेलगाम मध्ये अंदाजे 500 पर्यटक होते. अनेक नव्याने लग्न झालेली जोडपी होती पण हल्लेखोरांनी बहुतांशी पुरूषांनाच ठार केले. पल्लवीचे पती त्यांच्या मुलाने सकाळपासून काहीच खाल्ले नव्हते म्हणून ब्रेड आणायले गेले. तेव्हा गोळीबार झाला. सुरूवातीला त्यांना हा गोळीबार आर्मीचा असेल असं वाटलं. पण नंतर त्यांनी पतीच्या डोक्यात गोळी मारल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. नक्की वाचा:  Pahalgam Terror Attack: 'जा जाऊन मोदींना सांगा' कर्नाटक मधील व्यावसायिकाला ठार मारल्यानंतर त्याच्या पत्नीवर खेकसला हल्लेखोर.

पल्लवी-मंजुनाथ यांचा  हल्ल्याआधीचा शेवटचा व्हिडिओ

पल्लवी या Shivamogga, येथील आहे. त्यांनी मला पतीसह एअरलिफ्ट करा. आम्हांला एकटं परत जायचं नाही असं म्हटलं आहे. पल्लवी या बॅंक मॅनेजर आहेत तर त्यांचे पती बांधकाम व्यवसायामध्ये होते. मंजुनाथ यांच्या आईला अद्याप मुलाच्या निधानाची माहिती देण्यात आलेली नाही.