Rishi Bhatt caught attack on camera while ziplining | @TimesAlgebraIND

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आता आठवडा पूर्ण झाला आहे. सध्या पहलगाम मध्ये या हल्ल्यातील हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. तपासयंत्राणांकडून कसून तपास सुरू असताना आता या हल्ल्याच्या वेळी पर्यटकांनी शूट केलेले काही व्हिडिओज, फोटोज समोर येत आहेत ज्यामधून हल्लेखोरांचे धागेधोरे शोधण्याचं काम सुरू आहे. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडीयात वायरल झाला आहे ज्यात एक पर्यटक झीपलाईनचा आनंद घेत असताना खाली हल्लेखोर गोळ्या झाडत आहेत. Rishi Bhatt या पर्यटकाचा हा व्हिडिओ असून त्याने घडल्या प्रकाराची माहिती देताना केलेल्या काही दाव्यांवरून NIA आणि कश्मीर पोलिसांनी झीप लाईन ऑपरेटरला समन्स बजावला आहे.

Rishi Bhatt यांनी मीडीया शी बोलताना केलेल्या दाव्यानुसार, त्याचे झीपलाईन सुरू होण्यापूर्वी तो ऑपरेटर तीन वेळेस 'अल्लाहू अकबर' म्हणाला. भट्ट यांच्या म्हणण्यानुसार त्याच्या आधी ज्यांनी झीप लाईन केले तेव्हा तो काहीच म्हणाला नव्हता पण त्याच्या वेळेस 3 वेळेस अल्लाहू अकबर म्हणाला आणि काही क्षणांत गोळीबार सुरू झाला.

भट्ट याच्या माहितीनुसार, या क्षणी त्यांना काहीतरी गडबड झाल्याचे जाणवले. "मी माझा झिपलाइन दोरी थांबवला, सुमारे 15 फूट उंचीवरून खाली उडी मारली आणि माझ्या पत्नी आणि मुलासह धावू लागलो. मी फक्त माझा आणि माझ्या कुटुंबाचा जीव वाचवण्याचा विचार करत होतो." त्याने सांगितले की तो आणि त्याचे कुटुंब सुरक्षिततेसाठी श्रीनगरला जाण्यापूर्वी जंगलाकडे आणि नंतर पार्किंग क्षेत्रात पळून गेले. त्याच्या पत्नीच्या शेजारी आणखी दोन जोडपे होते.  नक्की वाचा: Terrorist Attack in Pahalgam: हल्लेखोरांनी पीएम मोदींची निंदा केली, वडिलांना इस्लामिक श्लोक म्हणायला लावले; पुण्याच्या जखमी संतोष जगदाळे यांंची लेक आसावरी जगदाळे ने सांगितला थरारक प्रसंग. 

Rishi Bhatt यांचा झीपलाईन वरील वायरल व्हिडिओ

Rishi Bhatt यांची प्रतिक्रिया

दरम्यान ऋषी भट्ट यांनी देखील दहशतवादी इस्लामिक प्रार्थना (कल्म) बोलून दाखवण्यास सांगत होते. गैर मुस्लिमांवर ते हल्ला करत होते. आपण झीपलाईन वर होतो म्हणून वाचलो अन्यथा आपल्यालाही गोळ्या घातल्या गेल्या असत्या अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

22 एप्रिलला दुपारी 3.30 च्या सुमारास जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या घातक दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. लष्कर-ए-तैयबा (एलईटी) चा एक भाग असलेल्या रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.