
Pakistan Violates Ceasefire: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यापासून (Terrorist Attack in Pahalgam) भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. पाकिस्तान आपल्या नापाक कारवाया थांबवत नाही. आज, पाकिस्तानने सलग 10 व्या दिवशी नियंत्रण रेषेजवळ (Line of Control) गोळीबार करून युद्धबंदीचे उल्लंघन (Violates Ceasefire) केले आहे. पाकिस्तानच्या अनेक चौक्यांवरून भारताच्या दिशेने विनाकारण गोळीबार करण्यात आला. तथापि, भारतीय लष्करानेही पाकिस्तानच्या या कृतीला चोख प्रत्युत्तर दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याच्या सुमारे 32 चौक्या सक्रिय झाल्या आहेत, जिथून गोळीबार करण्यात आला आहे.
छोट्या शस्त्रांनी गोळीबार -
प्राप्त माहितीनुसार, 03-04 मे 2025 च्या रात्री, पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांवरून जम्मू आणि काश्मीरच्या अनेक भागात गोळीबार झाला. यामध्ये कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूरच्या आसपासच्या भागात नियंत्रण रेषेवर लहान शस्त्रांचा विनाकारण गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानकडून झालेल्या या गोळीबाराला भारतीय सैन्यानेही लगेच प्रत्युत्तर दिले. (हेही वाचा - Pahalgam Terror Attack: 'अल्लाहू अकबर म्हणताच सुरू झाला गोळीबार'; झीपलाईन वर असलेल्या प्रत्यक्षदर्शी ऋषी भट्टचा खळबळजनक दावा, NIA ने झीपलाईन ऑपरेटरला बजावला समन्स (Watch Video))
32 पाकिस्तानी चौक्या सक्रिय -
03 आणि 04 मे च्या मध्यरात्री पाकिस्तानी सैन्याच्या सुमारे 32 चौक्या सक्रिय झाल्या. त्यांनी भारतीय सैन्याच्या दिशेने गोळीबार केला. भारतीय लष्कराला संशय आहे की पाकिस्तानने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यांद्वारे पाकिस्तानी सैन्य आपल्या दहशतवाद्यांना घुसवण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानला सीमापार किंवा सर्जिकल स्ट्राईकची भीती वाटते आणि म्हणूनच ते सतत अशा कारवाया करत आहे. पाकिस्तानच्या या कृतीमुळे काश्मीर आणि जम्मू क्षेत्रातील नियंत्रण रेषेवर तणाव वाढला आहे. (हेही वाचा - Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यातील संशयित कोलंबोला पोहोचले? चेन्नईहून आलेल्या विमानाची श्रीलंका विमानतळावर तपासणी)
ताज्या युद्धबंदी उल्लंघनादरम्यान, पाकिस्तानी सैन्याने पाच गटांमध्ये वेगवेगळ्या पातळीचे छावण्या उभारल्या आहेत. या चौक्या मानसेहरा, मुझफ्फराबाद, कोटली, मुरीदके आणि बहावलपूर येथे बांधण्यात आल्या आहेत. अल्फा 3 च्या मुख्य नियंत्रण कक्षातून हे दहशतवादी काश्मीरमध्ये घुसखोरीसाठी दहशतवाद्यांची योजना आखत आहेत आणि त्यांना प्रशिक्षण देत आहेत.