Covid-19 Vaccine Dry Run: पंजाब, आसाम, आंध्र  प्रदेश, गुजरात मध्ये 28, 29 डिसेंबरला कोविड 10 लसीची ड्राय रन; अशी असेल प्रक्रिया
COVID Vaccine Dry Run | Photo Credits: Twitter/ ANI

भारतामध्ये कोविड 19 लसीकरणासाठी जानेवारी 2021 मध्ये सुरूवात होऊ शकते. दरम्यान कोविड 19 लसीकरणाला देशात सुरूवात करण्यापूर्वी आज 28 डिसेंबर आणि उद्या 29 डिसेंबर या दोन दिवशी चार राज्यात ड्राय रन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश आणि गुजरात या राज्यांचा समावेश आहे. प्रत्येक राज्यातील 2 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. प्रामुख्याने लसीकरणाच्या मॉक ड्रिलमध्ये यावेळी Co-WIN app वर रिअल टाईल मॉनिटरिंग च्या माध्यमातून लसीकरणाच्या प्रक्रियेचा वेध घेतला जाणार आहे. लसीकरणाच्या प्रक्रियेतील काही संभाव्य धोके वेळीच ओळखण्यासाठी या ड्राय रनचं आयोजन करण्यात आले आहे.

भारतामध्ये अद्याप कोणत्याही कोविड 19 लसीला मान्यता मिळलेली नसली तरीही लवकरच सीरम इन्स्टिट्युटची लस बाजी मारू शकते असा अंदाज आहे. युके मध्ये येत्याकाही दिवसात ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लसीला मान्यता मिळाल्यानंतर भारतातही कोविशिल्ड लस रोल आऊट होऊ शकते. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आता देशात लसीकरणासाठी आरोग्य कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये 2360 जणांनी सहभाग घेतला असून त्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे. Covishield Covid-19 Vaccine ला भारतामध्ये DCGI कडून Emergency Use साठी पहिल्यांदा परवानगी मिळण्याची शक्यता.

भारतातील ड्राय रन ची प्रक्रिया कशी असेल?

भारतामध्ये लस रोल आऊट करण्यापूर्वी त्याची आता रंगीत तालीम सुरू झाली आहे. यामध्ये लस टोचण्याव्यतिरिक्त सार्‍या इतर बाबी तपासल्या जातील. Co-WIN app वर डाटा फीड केला जाईल, कोल्ड स्टोरेज तपासलं जाईल, लसीकरण स्थळ ते कोल्ड स्टोरेज या दरम्यान प्रवास केला जाईल. त्याला किती वेळ लागतो हे पाहिलं जाईल. सोबतच लसीकरण केंद्रावरीलही गर्दीचं नियोजन पाहिलं जाईल.

पंजाब मधील ड्रायरन 

आंध्र प्रदेशातील ड्राय रन

जिल्ह्यांत एकावेळी अनेक ठिकाणी लसीकरण केले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हॉस्पिटल्स, कम्युनिटी हेल्थ सेंटर्स, प्रायमरी हेल्थ केअर सेंटर्स, अर्बन साईट, प्रायव्हेट हेल्थ फॅसिलिटी आणि ग्रामीण भागातील वैद्यकीय कक्ष इथपर्यंत व्यवस्था पाहिली जाईल.

या मॉका ड्रिलमध्ये लसीकरणाचा प्लॅन फुल प्रुफ रहावा म्हणून आधीच कोणते गोंधळ होऊ शकतात याची माहिती घेतली जाणार आहे. तर प्रोग्राम मॅनेजर्सना देखील त्यांच्यावर नेमक्या कशा आणि कोणत्या जबाबदार्‍या असू शकतात याची याद्वारा माहिती होणार आहे.