'आप' च्या विजयासाठी अरविंद केजरीवाल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव; शरद पवार, ममता बॅनर्जी, गौतम गंभीर, सचिन पायलट यांच्यासहित सर्व पक्षांच्या नेत्यांनी केले अभिनंदन, पहा ट्विट
Arvind Kejariwal (Photo Credits: File Image)

दिल्ली विधानसभा निवडणुकीत 70 पैकी तब्बल 61 जागी (दुपारी २ वाजेपर्यंत) आप ने मोठी आघाडी घेतली आहे, त्यामुळे अरविंद केजरीवाल हे विजयाची हॅट्रिक करत आता पुन्हा एकदा दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी विराजमान होणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. केजरीवाल यांच्या दणदणीत विजयासाठी देशभरातील विविध पक्षाच्या नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. यामध्ये अगदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार ते बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, काँग्रेसचे नेते सचिन पायलट भाजपचे खासदार गौतम गंभीर, कपिल मिश्रा या व अन्य अनेक नेत्यांचा समावेश आहे. केजरीवाल यांनी विकासाचे आश्वासन दिले होते, त्यामुळे भाजपच्या अहंकाराला मोडून काढत दिल्लीवासीयांनी विकासाला निवडले अशी एक समान भावना या सर्व नेत्यांच्या शुभेच्छा ट्विट मधून दिसत येत आहे.  Delhi Assembly Election Results 2020 Live Updates: दिल्ली विधानसभा निवडणूक अपडेट्स 

अरविंद केजरीवाल यांच्या विजयाबाबत बोलतां अनेक नेत्यांनी भाजपवर निशाणा साधण्याची संधी हेरली होती, भाजपने धार्मिक मुद्द्यांवरून कटुता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मोदी आणि शाह यांनी दहशवादी भूमिका घेतल्या होत्या इतकं असूनही त्यांना आपल्याकडे केंद्र सरकार आहे म्हणजे राज्य ही असेल असा अहंकार होता मात्र दिल्लीच्या रहिवाश्यांनी हा सर्व अहंकार मोडीत काढून केजरीवाल यांच्या हातात पुन्हा दिल्लीचे सरकार दिले आहे अशा काही भावना सर्व नेत्यांच्या ट्विट मध्ये पाहायला मिळत आहेत.

पहा ट्विट्स

शरद पवार

सुप्रिया सुळे

ममता बॅनर्जी

पिनारायि विजयन

सचिन पायलट

गौतम गंभीर

दरम्यान, दिल्लीमध्ये आप च्या विजयाचे जोरदार सेलिब्रेशन सध्या सुरु आहे, आपच्या मुख्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी नाचून , लाडू वाटून आनंद साजरा केला जात आहे.