8th Pay Commission | (Photo credit: archived, edited, representative image)

Government Employees Salary Hike: 8 वा वेतन आयोग (8th Pay Commission) लवकरच स्थापन केला जाऊ शकतो, कारण त्यासाठी आवश्यक मान्यता केंद्र सरकारने दिली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या तब्बल 1 कोटींहून अधिक सेवेत असलेल्या आणि निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी आशा निर्माण झाली आहे. हे आजी-माजी कर्मचारी विद्यमान वेतन आणि निवृत्तीवेतन म्हणजेच पेन्शन किती आणि कशी मिळेल. भत्त्यांचा लाभ कसा होईल, त्यात किती वाढ (Central Government Employees) होईल याबाबत चर्चा करत आहेत.

कर्मचाऱ्यांमध्ये वाढली उत्सुकता

अनेक कर्मचाऱ्यांमध्ये फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) लक्षणीय पगार आणि पेन्शन वाढीच्या शक्यतेसह, अनेकांना त्यांची कमाई किती वाढू शकते हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. काहींनी तर आठवा वेतन आयोग लागू झाल्यास कर्मचाऱ्यांचे पगार तिप्पट होतील, असा शोध लावला आहे. ज्याला कोणताही आधार नाही. असे असले ती, खरोखरच ती तितकी होऊ शकते का? नवीन वेतन रचना 7 व्या वेतन आयोगाच्या समकक्ष बाबींच अनुसरण करू शकते का, ज्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतनात मोठा बदल झाला होता, याबाबत जाणून घ्या सविस्तर. (हेही वाचा, 8th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अपेक्षित पगारवाढ, फिटमेंट फॅक्टर आणि डीए गणना)

तुम्हाला माहिती आहे का? वेतन कसे वाढते?

आठवा वेतन आयोग लागू होईल म्हणून अनेक लोक आनंदात आहेत. पण त्यातील बहुतेकांना वेतन वाढ कशी होते याबाबत माहिती नाही. खरे तर वेतनवाढीसाठी वापरला जातो एक फॉर्म्युला, जो तयार केला आहे डॉ. वॉलेस आयक्रोयड (Dr. Wallace Aykroyd) यांनी. हा फॉर्म्युला जीवनमानाच्या किमान खर्चावर आधारित पगार समायोजन निर्धारित करण्यासाठी वापरली जाणारी प्रणाली आहे. जो अन्न, वस्त्र आणि घर यासारखे आवश्यक खर्च विचारात घेतो, मूलभूत गरजांसाठी वेतन पुरेसे आहे याची खात्री करते. सरकारी कर्मचाऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी भारताने 1957 मध्ये हे सूत्र स्वीकारले. (हेही वाचा, 8th Pay Commission Salary Hike: आठवा वेतन आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांना करणार मालामाल? जाणून घ्या संभाव्य Fitment Factor, वेतनवाढ, पेन्शन सुधारणा)

7 व्या वेतन आयोगाचा परिणाम

7 व्या वेतन आयोग लागू करताना हे सूत्र लागू केले, ज्यामुळे पगारात लक्षणीय वाढ झाली. 2.57 च्या फिटमेंट फॅक्टरसह किमान मूळ वेतन 7,000 रुपयांवरुन 18,000 रुपये करण्यात आले. सन 2016 पासून, ही प्रणाली महागाईच्या अनुषंगाने पगार समायोजित करण्यासाठी वापरली जात आहे.

8 व्या वेतन आयोगाअंतर्गत अपेक्षित पगारवाढ

महागाईवर आधारित पगार समायोजित करण्यासाठी 8 वा वेतन आयोग आयक्रोयड फॉर्म्युला वापरणे कायम ठेवेल असा तज्ञांचा अंदाज आहे. प्रसारमाध्यमांतून येणारी वृत्तं दावा करतात की, सरकार 1.92 आणि 2.86 दरम्यान फिटमेंट फॅक्टर लागू करू शकते, ज्यामुळे पुढील संभाव्य पगारात वाढ होऊ शकते. संभाव्य पगारवाढ खालील प्रमाणे:

पगार आणि पेन्शन वाढीची गणना कशी केली जाईल?

पगाराची पुनरावृत्ती फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते, जी सध्याच्या मूळ पगारावर किंवा पेन्शनच्या रकमेवर लागू केली जाते. अंतिम टक्केवारी वाढीबाबत अद्याप चर्चा सुरू असताना, आयोगाची रचना, अध्यक्ष आणि सदस्यांबाबत लवकरच अधिकृत घोषणा अपेक्षित आहे. महागाईचा दैनंदिन खर्चावर परिणाम होत असल्याने, सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक 8 व्या वेतन आयोगाने त्यांचे आर्थिक भविष्य कसे घडवेल याच्या अद्यतनांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

(वाचकांसाठी सूचना: लेखातील आकडेवारी आणि माहिती प्राप्त माहितीवर आधारीत आहे. त्यामुळे सदर आकडेवारीची जबाबदारी लेटेस्टली स्वीकारत नाही.)