गुजरात ते दिल्लीपर्यंत उभारली जाणार 5 किमी रुंद 'ग्रीन वॉल ऑफ इंडिया'; Global Warming चा सामना करण्यासाठी केंद्र सरकारची योजना
प्राथमिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

सध्या महाराष्ट्रात मेट्रोची कारशेड (Metro Car Shed) आणि आरे कॉलनीमधील (Aarey Colony) झाडांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. कारशेड बनवण्यासाठी आरेमधील 2000 पेक्षा अधिक झाडांची कत्तल झाली आहे. आता दुसरीकडे पर्यावरणाचे रक्षण आणि देशातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी केंद्र सरकार एक नवीन पुढाकार घेणार आहे. आफ्रिकेत सेनेगल ते जिबूती पर्यंतच्या हरित पट्टीच्या धर्तीवर गुजरात ते दिल्ली-हरियाणा सीमेपर्यंत 'ग्रीन वॉल ऑफ इंडिया' (Green Wall' Of India) उभारण्यात येणार आहे. या भिंतीची लांबी 1400 किलोमीटर असेल तर रुंदी पाच किलोमीटरपर्यंत असेल.

आफ्रिकेत ही भिंत पर्यावरणीय बदल आणि वाढत्या वाळवंटाशी सामना करण्यासाठी बांधली गेली आहे. याला 'सहाराची ग्रीन वॉल' म्हणून देखील ओळखले जाते. पर्यावरणाच्या संरक्षणासह पश्चिमेकडून येणा धूळयुक्त हवेला रोखने हे त्याचे मुख्य उद्दीष्ट आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार सरकारची ही कल्पना अद्याप पहिल्या टप्प्यात आहे, हा प्रकल्प मंजूर झाल्यास भारतातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी भविष्यातही हे एक उत्तम उदाहरण असेल. पोरबंदर ते पानीपतपर्यंत ही ग्रीन वॉल उभारली जाणार आहे, यामुळे घसरत जाणारा वनक्षेत्र वाढेल. याशिवाय गुजरात, राजस्थान, हरियाणा ते दिल्ली पर्यंतच्या अरवली टेकड्यांवर हिरवळ कमी होण्याचे संकटही कमी होईल. (हेही वाचा: Aarey Protest: आरे वृक्षतोडी विरोधात सुरु असलेल्या आंदोलनावर प्रकाश जावडेकर यांची प्रतिक्रिया- दिल्ली मेट्रोसाठी सुद्धा झाडे कापलेली)

केंद्र सरकार या योजनेला प्राधान्य देऊन लवकरात लवकर ती सुरु करण्याचा विचार करत आहे. या योजनेद्वारे 26 दशलक्ष हेक्टर जमीन प्रदूषणमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. 2030 पर्यंत ही योजना अमलात येण्च्याची शक्यता आहे. सरकारची ही योजना सत्यात उतरली तर त्याच्या गुजरात, राजस्थान, हरियाणा या राज्यांना फार मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.