मुंबईतील (Mumbai) आरे कॉलनीत (Aarey Colony) मेट्रो उभारणीसाठी झाडे कापण्यात येत आहेत. यावरुन आता पर्यावरणप्रेमी आणि विरोधी पक्षांकडून आरे परिसरात जोरदार आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या आंदोलनात एनडीए (NDA) सरकारमधील शिवसेना (Shiv Sena) सुद्धा वृक्ष तोडीच्या विरोधात उभी राहिली आहे. याप्रकरणी आता केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी लखनौ येथे असे म्हटले की, दिल्ली मेट्रो उभारणीसाठी सुद्धा हजारोंच्या संख्येने झाडांची कत्तल करण्यात आली होती. त्यावेळी ही लोकांनी या प्रकाराला विरोध दर्शवला होता. मात्र यावर स्पष्टीकरण देत असे म्हटले की, एक झाड तोडल्यानंतर पाच अधिक रोपटी लावण्यात आली होती.
दिल्ली मेट्रो आज देशातील सर्वात उत्तम मेट्रो असल्याचे जावडेकर यांनी म्हटले आहे. तर मुंबईतील आरे कॉलनी मधील झाडे तोडण्यासाठी परवानगी हायकोर्टानेच दिली आहे. वन संरक्षण संबंधित एका संघटनेने मेट्रो उभारण्यासाठी करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीमुळे ग्रीन ट्रिब्युनल ते हायकोर्टापर्यंत दरवाजे ठकठकवले होते.(Aarey Protest: आरे वृक्षतोडी विरोधात सुरु असलेल्या आंदोलनावर प्रकाश जावडेकर यांची प्रतिक्रिया- दिल्ली मेट्रोसाठी सुद्धा झाडे कापलेली)
हायकोर्टाने या प्रकरणी सुनावणी केल्यानंतर 4 ऑक्टोंबरला यावर अंतिम निर्णय दिला. यामध्ये झाडांची कत्तल केली जाणार असल्यावर बंदी घालणार नसल्याचे हायकोर्टाकडून सांगण्यात आले. त्यामुळेच प्रशासनाकडून शुक्रवारी संध्याकाळी उशिरापासून झाडे तोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. घटनास्थळी लोकांनी आंदोलन केल्यामुळे तीन किमी अंतराच्या आतमध्ये कोणाला ही प्रवेश दिला जाणार नसल्याचे जाहीर केले आहे.