Drug | (Photo Credit: Archived, edited, representative images)

केंद्र सरकारने 14 फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (FDC) औंषधांवर यापूर्वीच बंदी घातली आहे. ज्यामध्ये उपचारात्मक कोणतेही औचित्य नाही आणि ती नागरिकांसाठी एक जोखीम ठरु शकतात, या कारणास्तव केंद्राने या औषधांवर बंदी घातली. दरम्यान, आता आणखी अशीच तीन औषधे केंद्र सरकारच्या रडारवर आली आहेत. सरकार या औषधांना परवानीग द्यायची किंवा नाही याबाबत विचार करते आहे. लवकरच त्याची परिणामकारकता आणि माहिती संग्रहीत केली जाईल, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने म्हटल आहे.

फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन म्हणजे ज्या औषधांची मात्रा संयुक्तरित्या दिली जाते. FDC म्हणजे अशी औषधे ज्यात दोन किंवा अधिक सक्रिय फार्मास्युटिकल घटकांचे (APIs) एक निश्चित गुणोत्तर मिश्रण असते. या आधी बंदी घालण्यात आलेल्या 14 फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन ड्रग्समध्ये निमसुलाइड आणि पॅरासिटामॉल डिस्पेसिबल टॅब्लेट आणि क्लोफेनिरामाइन मॅलेट आणि कोडीन सिरप यांचा समावेश आहे. पाठिमागील काही वर्षांमध्ये एफडीए औषधांचा बेकयदेशीररित्या वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळेच या प्रकाराला आळा घालण्यासाठी केंद्राने मोठी योजना राबवली आहे. ज्यात कारवाई केल्यामुळे पॅरासिटामॉल + फेनिलेफ्रिन + कॅफिन हे तीन संयोजनने, कॅफीन + पॅरासिटामॉल, फेनिलेफ्रिन + क्लोरफेनिरामाइन आणि पॅरासिटामॉल + प्रोपीफेनाझोन + कॅफीन आदींवर गदा आली.

फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन्स म्हणजे काय?

फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन्स (FDCs) हे औषधी उत्पादनांचा संदर्भ देतात. ज्यात दोन किंवा अधिक सक्रिय घटक एकाच डोस फॉर्ममध्ये निश्चित आणि विशिष्ट डोसमध्ये एकत्रित केलेले असतात. जसे की टॅब्लेट, कॅप्सूल किंवा सिरप. संयोजनातील प्रत्येक सक्रिय घटक औषधाच्या उपचारात्मक प्रभावामध्ये योगदान देतो.

अनेक औषधांचा एकाच वेळी वापर करणे आवश्यक असलेल्या विशिष्ट वैद्यकीय परिस्थितींसाठी सोयीस्कर आणि प्रभावी उपचार पर्याय प्रदान करणे हे FDCs मागचे तर्क आहे. एकाच फॉर्म्युलेशनमध्ये भिन्न सक्रिय घटक एकत्र करून, FDCs अनेक संभाव्य फायदे देतात, ज्यात रुग्णांचे सुधारित पालन, सरलीकृत डोसिंग पथ्ये आणि वर्धित उपचारात्मक परिणाम यांचा समावेश होतो.