Drug | (Photo Credit: Archived, edited, representative images)

Medicines Banned in India: केंद्रीय औषध नियामक प्राधिकरणाने (CDRA) बाजारात उपलब्ध औषधांच्या दर्जाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. लाइफ मॅक्स कॅन्सर लॅबोरेटरीजने उत्पादित केलेल्या शेल्कल 500 (Shelcal 500), संयोजन औषध पॅन डी (Combination drug Pan D) आणि व्हिटॅमिन डी 3 (Vitamin D3) टॅब्लेट देखील गुणवत्ता चाचणीत (Quality Test) अपयशी झाल्या आहेत. एकूण 49 औषधांचे नमुने 'नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी' (Not of Standard Quality) (NSQ) घोषित करण्यात आले आहेत. ज्यात पॅरासिटामॉल, ऑक्सिटोसिन आणि फ्लुकोनाझोल सारख्या सुप्रसिद्ध औषधांचा समावेश आहे.

सीडीआरएच्या गुणवत्ता चाचणीमध्ये सुमारे 3,000 नमुने समाविष्ट होते, त्यापैकी 1.5% निकृष्ट आढळले. यामध्ये टॅम्सुलोसिन आणि डुटास्टेराइड टॅबलेट्स (UrimaxD), कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी 3 टॅब्लेट आयपी (शेलकल 500), पॅन्टोप्राझोल गॅस्ट्रो-प्रतिरोधक आणि डोम्पेरिडोन प्रदीर्घ-रिलीझ कॅप्सूल IP (PAN-D), नंद्रोलोन डेकानाओट इंजेक्शन आईपी 25mg/ml ची गुणवत्ता चाचणी अयशस्वी ठरली. तथापी, गुणवत्ता चाचणीत अनुत्तीर्ण होणाऱ्या 49 औषधांचा अहवालात उल्लेख आहे. (हेही वाचा - Center's Action on Indian Cough Syrup: भारतीय कफ सिरपवर केंद्राची कारवाई, सरकारी लॅबमध्ये चाचणी केल्यानंतरच होणार निर्यात; 1 जूनपासून नवीन नियम लागू)

या यादीमध्ये अल्केम हेल्थ सायन्स, अरिस्टो फार्मास्युटिकल्स आणि हिंदुस्थान अँटिबायोटिक्स सारख्या प्रसिद्ध कंपन्यांच्या अनेक उत्पादनांचा समावेश आहे. कर्नाटक अँटिबायोटिक्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेडने उत्पादित केलेल्या पॅरासिटामॉलच्या गोळ्यांच्या गुणवत्तेच्या समस्याही तपासात उघड झाल्या आहेत. (Cough Syrup Row: देशातील 71 कंपन्यांना बजावल्या कारणे दाखवा नोटीस, तर 18 कंपन्या बंद करण्याचे आदेश; कफ सिरप वादावर आरोग्य मंत्री Mansukh Mandaviya यांची माहिती)

गुणवत्तेच्या चाचणीत अयशस्वी झालेल्या औषधांची यादी -

  • न्यूरोटेम-एनटी
  • Cefuroxime Axetil गोळ्या IP 500 mg (JKMSCL सप्लाय)
  • Loperamide Hydrochloride गोळ्या IP (JKMSCL हॉस्पिटल सप्लाय)
  • Floxages-OZ (Ofloxacin आणि Ornidazole गोळ्या IP)
  • Wintel 40 गोळ्या
  • मोक्सिका -250 [अमोक्सिसिलिन डिस्पर्सिबल टॅब्लेट आयपी 250 मिग्रॅ]
  • फ्रुसेमाइड इंजेक्शन आयपी 20 मिग्रॅ
  • क्लोक्सासिलिन सोडियम कॅप्सूल आयपी 250 मिग्रॅ
  • फ्लोरोमेथोलोन आय ड्रॉप्स आयपी
  • पॅनलिब 40 गोळ्या
  • ब - सिडल 625
  • ट्रिप्सिन, ब्रोमेलेन आणि रुटोसाइड ट्रायहायड्रेट गोळ्या [फ्लेवोशाइन]
  • C Mont LC Kid 60 ml (Montelukast & Leveocetirizine
  • Dihydrochloride सिरप)
  • योगराज गुग्गुलु टॅब्लेट
  • तेलमिसर्टन टॅब आयपी 40 एमजी
  • पँटोप्राझोल इंज. बीपी 40 एमजी
  • ग्लिमेपिराइड टॅब आयपी
  • खोकला सिरप

दरम्यान, औषध नियंत्रक जनरल अजितसिंग रघुवंशी यांनी सांगितले आहे की, विशिष्ट बॅचच्या औषधांचे नमुने अयशस्वी झाले याचा अर्थ त्या नावाखाली विकली जाणारी सर्व उत्पादने निकृष्ट दर्जाची आहेत असे नाही. फक्त त्या विशिष्ट बॅचचा दर्जा कमी मानला जातो. सार्वजनिक सुरक्षेसाठी बनावट आणि NSQ औषधे बॅचनुसार परत मागवण्यात आली आहेत.