योगी आदित्यनाथ यांना खुनाची धमकी देणाऱ्या 20 वर्षीय तरुणाला नाशिक मधून अटक ; 24 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Darshana Pawar
|
May 24, 2020 11:53 PM IST
संपूर्ण देशाची चिंता वाढवणारे कोरोना व्हायरसचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोना रुग्णांची वाढ कायम असून बळींचा आकडाही वाढताना दिसत आहे. तर कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही चांगले आहे. देशातील कोरोना बाधितांची संख्या 125101 इतकी झाली असून दिवसागणित ती वाढत आहे. दरम्यान कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. तसंच लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात संपर्ण भारत देश आहे.
लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या विविध समस्या सोडवण्याचे काम सध्या सुरु आहे. स्थलांतरीत मजूरांना इच्छित स्थळी पोहचवण्यात येत आहे. तर 25 मे पासून देशांतर्गत विमानसेवा सुरु होत आहे. विशेष म्हणजे 1 जून पासून 200 विशेष प्रवासी ट्रेन्स चालवण्यात येणार आहेत. नॉन रेड झोन मध्ये उद्योगधंदे सुरु झाले असून बेरोजगारांना मनरेगा अंतर्गत कामही देण्यात येत आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
महाराष्ट्र राज्यातील विशेषतः मुंबईतील वाढती रुग्णसंख्या आणि पावसाळ्यात कोरोनाच्या संकटात गैरसोयींची भर पडू नये म्हणून विविध ठिकाणी क्वारंटाईन सेंटर्सची सोय करण्यात येत आहे. दरम्यान महाराष्ट्रात शैक्षणिक वर्ष 2020-21 दरम्यान शाळा 15 जूनपासून सुरु करण्याची योजना सरकार आखत आहे. मात्र कॉलेजबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. तसंच राज्यात 10 वी, 12 वी परीक्षांचे निकालही अजून लागायचे आहेत.