Shooting | Representative Image (Image Credit: Reuters/ANI)

केंटकीतील (Kentucky Shooting News) लेक्सिंग्टन शहरात रिचमंड रिचमंड रोड बॅप्टिस्ट चर्चमध्ये (Richmond Road Baptist Church) रविवारी झालेल्या गोळीबारात (Lexington Church Shooting) दोन महिलांचा मृत्यू झाला असून दोन पुरुष जखमी झाले आहेत. या हिंसक घटनेनंतर संशयिताने एका पोलिस अधिकाऱ्यावर गोळी झाडली आणि त्यानंतर चर्चमध्ये धाव घेत गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी संशयिताला ठार केले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही घटना Blue Grass विमानतळाजवळील टर्मिनल ड्राइव्ह येथे सकाळी 11:35 वाजता (ET) दरम्यान घडली. एका राज्य पोलीस अधिकाऱ्याने (ट्रूपर) एका वाहनाला थांबवले असता, त्या वाहनातील व्यक्तीने त्यांच्यावर गोळी झाडली आणि घटनास्थळावरून पळून गेला.

लेक्‍सिंग्टन पोलिस आयुक्त लॉरेन्स वेदर्स यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, संशयिताने दुसरे वाहन हायजॅक करून अंदाजे 15 मैलांवर असलेल्या Richmond Road Baptist Churchमध्ये प्रवेश केला आणि तेथे जमलेल्या लोकांवर गोळीबार केला. वेदर्स यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, संशयित चर्चमधील काही व्यक्तींशी संबंधित असू शकतो, परंतु याविषयी अधिक माहिती देण्यात आलेली नाही.

तीन पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी गोळीबार करून त्याला ठार केले. अद्याप पोलिसांनी संशयिताचे नाव जाहीर केलेले नाही, कारण त्याच्या कुटुंबीयांना याची माहिती दिलेली नाही.

गोळीबारातील मृत व जखमी

मृत व्यक्तींची नावे:

  1. बेव्हर्ली गम (72 वर्षे)
  2. क्रिस्टिना कॉम्ब्स (34 वर्षे)

जखमी झालेल्या दोन पुरुषांपैकी एकाची प्रकृती गंभीर असून दुसऱ्याची प्रकृती स्थिर आहे. गोळी लागलेला ट्रूपर देखील स्थिर अवस्थेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना विमानतळाशी संबंधित नसली तरी तिचा काही काळ टर्मिनल ड्राइव्हवरील वाहतुकीवर परिणाम झाला.

Blue Grass विमानतळ प्रशासनाने X वर म्हटले की, 'आमचे पथक प्रवाशांना पार्किंगच्या उघडलेल्या जागांवर नेण्याचे काम करत आहे. सर्व उड्डाणे आणि ऑपरेशन्स आता सुरळीत सुरु आहेत.'

स्थानिक हादरले

Fayette County चे कोरोनर गॅरी गिन यांनी सांगितले की, चर्चमधील सदस्य खूपच आपापसात जोडलेले असून, काही वेळातच मृतांच्या नातेवाइकांना कळवण्यात आले. या वेळी चर्चमधील प्रवचन फेसबुकवर लाईव्ह प्रसारित होत होते. या प्रवचनात पाद्री जेरी गम यांनी मृत्यूचा 10 वेळा उल्लेख केला, असे वृत्तCNN ने दिले आहे.

राजकीय नेत्यांची प्रतिक्रिया

दरम्यान, पोलिसांनी संशयिताची ओळख पटवली असून त्याच्या कुटुंबियांना माहिती दिल्यानंतर नाव जाहीर केले जाईल. घटनेचा तपास सुरू आहे.