कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण महाराष्ट्राला (Maharashtra) हादरून सोडले आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. दरम्यान, सर्वसामन्यांसह राजकीय नेतेही आता कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकत चालले आहे. महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाची संसर्ग झाला होता. यातच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Former Chief Minister Ashok Chavan) यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळून आली आहेत. यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण पाहायला मिळत आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र, अद्यापही कोरोनाबाबतीत सकारात्मक बदल दिसून आला नाही. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज 3 हजार 41 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, 58 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 50 हजार 231 वर पोहचली आहे. यापैकी 1 हजार 635 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 14 हजार 600 जणांनी कोरोनावर मात केली आहे. हे देखील वाचा- Shramik Special Train: 'श्रमिक स्पेशल ट्रेन साठी उद्धव ठाकरे यांनी 1 तासात मजुरांची यादी द्यावी, आवश्यक तेवढ्या रेल्वे पुरवू', रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे महाराष्ट्र सरकारला आश्वासन

ट्वीट- 

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण भारताला हादरून सोडले आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ पाहता प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक कठोर पावले उचलली जात आहेत. सध्या महाराष्ट्रात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याने नागरिकांनी तात्पूर्ता सुटकेचा श्वास घेतला आहे.