Shramik Special Train: 'श्रमिक स्पेशल ट्रेन साठी उद्धव ठाकरे यांनी 1 तासात मजुरांची यादी द्यावी, आवश्यक तेवढ्या रेल्वे पुरवू', रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे महाराष्ट्र सरकारला आश्वासन
Piyush Goyal And Uddhav Thackeray (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात (Maharashtra) अडकून पडलेल्या परराज्यातील मजुरांसाठी महाराष्ट्र सरकारकडून केंद्राला श्रमिक स्पेशल ट्रेन्सची मागणी केली जात आहे मात्र केंद्राकडून या कामात दिरंगाई होत आहे अशा आशयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray)  यांनी आज राज्यातील नागरिकांशी संवाद साधताना नाराजी व्यक्त केली होती. याची दखल घेत केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल (Piyush Goyal)  यांनी लगेचच ठाकरे यांना उत्तर दिले आहे. उद्धवजी आपण एका तासात आवश्यक माहिती द्या, तुम्हाला हव्या तितक्या रेल्वेगाड्या उपलब्ध करून देऊ,” असं म्हणत गोयल यांनी एक खास पोस्ट लिहिली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी भारतीय रेल्वेकडे 200 ट्रेनची गरज असल्याचे सांगत लिस्ट दिल्याचा दावा केला होता असे टीव्हीच्या माध्यमातून समजले मात्र मध्ये रेल्वेकडे याचा काहीही फॉलो अप नाही, त्यामुळे तुम्ही एका तासाच्या मजुरांची यादी देण्याची कृपा करा आम्ही ट्रेन उपलब्ध करून देऊ असे आश्वासन गोयल यांनी महाराष्ट्र सरकारला दिले आहे.

प्राप्त माहितीनुसार, स्थलांतरित मजुरांना घरी पोहोचवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे मात्र, केंद्राकडून रेल्वे सोडल्या जात नाही. राज्य सरकारनं 80 रेल्वे गाड्यांची मागणी केली होती. मात्र, 30 ते 40 रेल्वे उपलब्ध करून दिल्या जात आहेत,” अशी नाराजी उद्धव ठाकरे यांनी मांडली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे

पियुष गोयल यांची पोस्ट नेमकी काय आहे?

उद्धवजी, आशा आहे की तुमची प्रकृती चांगली आहे. तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा. उद्या आम्ही 125 श्रमिक रेल्वेगाड्या देण्यास तयार आहोत. तुम्ही सांगितलं की, तुमच्याकडे मजुरांची यादी तयार आहे. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे. सर्व आवश्यक माहिती जसं की, रेल्वे कुठून सुटणार? रेल्वे गाड्यांनुसार मजुरांची यादी, त्यांची तपासणी केलेलं आरोग्य प्रमाणपत्र आणि रेल्वे कोठे जाणार? ही सर्व माहिती एका तासात मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना द्यावी, ही विनंती. त्यामुळे आम्हाला रेल्वेगाड्या वेळेनुसार सोडता येतील. आशा आहे की, यापूर्वीप्रमाणे गाडी रेल्वे स्थानकावर आल्यानंतर रिकामी जाऊ नये. तुम्हाला हव्या तितक्या रेल्वे गाड्या उपलब्ध करून दिल्या जातील.

या पोस्ट नंतर एक तास उलटताच पियुष गोयल यांनी आणखीन एक ट्विट करून पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला माहिती देण्याची विनंती केली. दीड तास उलटूनही आश्यक माहिती रेल्वे प्रशासनाला देण्यात आलेली नाही. या प्लॅनिंग साठी वेळ लागतो त्यामुळे कृपया सहकार्य करा असे पियुष गोयल यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे.

पियुष गोयल ट्विट

दरम्यान, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातुन 7.38 लाख मजूर 527 ट्रेनने त्यांच्या राज्यात परतले. दररोज जास्तीत जास्त ट्रेनची केंद्राकडे मागणी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आतापर्यंत मजूरांच्या तिकिटांसाठी 85 कोटी देण्यात आलेत अशी माहिती आज दिली आहे.