महाराष्ट्रात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला. राज्यात कंटेनमेंट झोन, ग्रीन, रेड, ऑरेंज झोन ची विभागणी करून त्याप्रमाणे नियमावली बनविण्यात आली. याचा उद्देश हा एकच होता की लोकांचे कोणतेही आर्थिक नुकसान होऊ नये, याबाबत अधिक माहिती देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी जनतेशी संवाद साधला. कोरोनाबाबत राज्य सरकारने केलेली नवीन व्यवस्था आणि उपाययोजना यांवर माहिती दिली आहे. त्याचसोबत येणा-या काळात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होणार असून हा गुणाकर जीवघेणा असल्याचे संकेत दिले. मात्र लोकांनी घाबरून जाऊ नका असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर महाराष्ट्राला रक्ताची गरज असल्यामुळे रक्तदान करा असे आवाहनही जनतेला केले आहे.
राज्यात मागील 15 दिवसांत कोरोनाचे रुग्ण वाढून हा आकडा सव्वा ते दीड लाखापर्यंत जाईल असे सांगण्यात आले होते. मात्र जनतेच्या सहकार्यामुळे तसे झाले नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पाहूयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेले महत्त्वाचे मुद्दे
1. कोरोना व्हायरस पुढील काही दिवसांत झपाट्याने वाढणार असून पुढील महिन्यापर्यंत राज्यातील रुग्णालयांत एकूण 13-14,000 बेड्स उपलब्ध होतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र रक्षणासाठी सज्ज असलेल्या कोविड योद्धांचे मानले विशेष आभार, पत्राद्वारे दिला मोलाचा सल्ला
2. व्हेंटिलेटरपेक्षा ऑक्सिजनची गरज जास्त जाणवत असल्याने त्याची व्यवस्था करत आहोत.
3. महाराष्ट्राल रक्ताची गरज असल्यामुळे रक्तदान करा
4. कोरोनासह पावसाळ्यात येणा-या साथींच्या आजारासाठी सज्ज राहा. योग्य ती काळजी घ्या. आजार अंगावर काढू नका. सर्दी, ताप सारखी लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
5. कोरोनाचे रुग्ण वाढले तरी घाबरून जाऊ नका राज्य सरकार सर्वोतोपरी सज्ज आहे.
6. शाळा तसेच चित्रीकरण सुरु करण्यावर विचार सुरु
7. पोकळं घोषणा करणार सरकार नाही. त्यामुळे राजकारण न करता जनतेसाठी लढणार.
8. एसटी सेवा सुरु झाली असून आतापर्यंत असंख्य मजूरांना, विद्यार्थ्यांना त्यांची घरी पाठवले आहेत.
9. राज्याने आतापर्यंत 481 रेल्वे पाठविल्या असून दिवसाला 80 रेल्वे मिळण्याची केंद्र सराकारकडे मागणी केली आहे.
10. कापूस खरेदी कशी करायची यावर विचार सुरु असून सर्व शेतक-यांबाबत देखील राज्य सरकार विचार करत आहे.
यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देऊन रस्त्यावर न येता घरातच नमाज अदा करा आणि आपल्या देवाकडे हे संकट नष्ट होवो अशी देवाकडे प्रार्थना करा असेही सांगितले.