दिल्लीतील कंटेन्मेंट झोनच्या यादीमध्ये 14 नवीन ठिकाणांचा समावेश; 22 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
अण्णासाहेब चवरे
|
May 23, 2020 12:00 AM IST
कोरोना व्हायरस (Coranavirus) संकटाविरुद्ध अवघे जग लढते आहे. अद्याप तरी जगाचा हा लढा यशस्वी झाला नाही. प्रयत्न सुरु आहेत. कोरोना व्हायरस रुग्णांची जगभरातील आकडेवारी वाढते आहे. त्याचसोबत कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांच्या मृत्यूचीही आकडेवारी वाढते आहे. नाही म्हणायला उपचार घेऊन ठणठणीत बरे होऊन परतणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. परंतू, बरे झालेल्यांना पुन्हा कोरोना होणार नाही याचीही खात्री नाही. त्यात कोरोना व्हायरसवर औषध अथवा प्रतिजैवक असेही काही उपलब्ध नाही. त्यामुळे जगभरातील सर्वच देशांची चिंता वाढली आहे.
कोरोना व्हायरस रुग्णांची वाढती संख्या पाहून जगभरातील देश चिंतेत आहेत. पण ही चिंता केवळ रुग्णवाढीची नाही. त्यासोबत घेण्यात आलेल्या लॉकडाऊन वारंवार लांबवावाव लागतोय ही देखील एक चिंता आहेच. कारण, लॉकडाऊन घेतल्याने जगभरातील अनेक देशांचे व्यवहार ठप्प आहेत. स्थानिक पातळीवरुन ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वच व्यवहारांची श्रृंखला खंडीत झाली आहे. त्यामुळे उलाढाल ठप्प आहे. उलाढाल ठप्प असल्याने अर्थव्यवस्थेवर मोठे सकट आले आहे. ही अर्थव्यवस्था मग स्थानिक, प्रादेशिक असो अथवा राष्ट्रीय. सर्वांनाच दणका बसला आहे.
दरम्यान, भारताचा आणि त्यातही महाराष्ट्राचा विचार करायचा तर लॉकडाऊन 4.0 मध्ये उद्योजकांना आपले उद्योग सुरु करण्यास सरकारने सशर्थ परवानगी दिली आहे. गेले महिनाभर बंद असलेले उद्योग हळूहळू सुरु होऊ पाहात आहेत. पण, या उद्योजकांना आता कामगार मिळणे कठीण होऊन बसले आहे. कारण, बहुसंख्य कामगारांनी स्थलांतर करत आपापली मूळ गावं गाठली आहेत.
मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातील विविध भागांतून कामगार परत गेले आहेत. अशा स्थितीत उद्योग सुरु करायचे तर कामगार आणायचे तरी कोठून? असा प्रश्न उद्योजकांसमोर निर्माण झाला आहे. दुसऱ्या बाजूला अनेक कर्मचारी, कामगारांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. त्यामुळे तोही एक नवाच प्रश्न निर्माण होऊन बसला आहे. कोरोना व्हायरस, लॉकडाऊन आणि यांसह स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घटना, घडामोडींची अद्ययावत माहिती जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉग सोबत जोडलेले राहा.