Modi Kit: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून गरीबांना मदत; 'या' जीवनावश्यक साहित्यांचे करणार वाटप

कोरोना विषाणूचे (Coronavirus) संपूर्ण जगाला हादरून टाकले आहे. कोरोना विषाणू 170 हून अधिक देशात हाहाकार माजवला आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केल जात आहेत. तर, काही देशात संचारबंदी (Lockdown) लागू करण्यात आली आहे. यात भारताचाही समावेश आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narenra Modi) यांनी मंगळवारी संपूर्ण देशात संचारबंदी लागू केली होती. दरम्यान, कोरोना विषाणूमुळे भारतात बिकट परिस्थिती निर्माण झाली असून सर्व सामन्य लोकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. यात हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. जीवनाश्यक साहित्यांसाठी त्यांना झगडावे लागत आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (BJP) हातवर पोट भरणाऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूच्या संकटाला सामोरे जात असलेल्या लोकांना भाजपकडून मोदी किट माध्यमातून जीवनाश्यक साहित्यांचा पुरवठा केला जात आहे.

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगाचे लक्ष केंद्रीत करून घेतले आहे. कोरोना सारख्या भंयकर विषाणूने आतापर्यंत 21 हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. तर तब्बल 4 लाखांहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. कोरोनाचे विषाणूनचे वाढते प्रादुर्भाव पाहता खबरदारीचा उपाय म्हणून अनेक राष्ट्रांनी आपपल्या संचारबंदीचा मार्ग निवडला आहे. यानंतर 24 मार्च रोजी भारतातही 21 दिवसांची संचारबंदी लागू केले आहे. दरम्यान, भारतातील गोर गरिबांना जीवनश्यक साहित्य मिळवण्यासाठी मोठा समाना करावा लागत आहे. याचदरम्यान भाजपने या संकटाला सामोरे जात असलेल्या लोकांच्या मदतीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. भाजपकडून अशा गरजू लोकांना 'मोदी किट'च्या माध्यमातून जीवनावश्यक साहित्य दिले जात आहे. हे देखील वाचा- कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी भारतीय सेना तयार, 'ऑपरेशन नमस्ते' ची घोषणा 

कपिल मिश्रा यांचे ट्वीट-

भाजपकडून संचारबंदीच्या काळात गरिबांना दिल्या जाणाऱ्या मोदी कीटमध्ये तांदूळ, डाळ बिस्किट, तेल आणि साबणासारख्या वस्तूंचा समावेश आहे. संपूर्ण देशात मोदी किटचे वाटप करण्यात येणार आहे, अशी सूचना भाजपच्या हायकंमांडने दिली आहे. भाजप नेते कपिल मिश्रा यांनी यासंदर्भात टि्वट केले आहेत. त्यांना या किटमध्ये देण्यात येणारी जीवनाश्यक साहित्यांची त्यांनी यादी शेअर केली आहे. तत्पूर्वी, केंद्र सरकारने देशातील गरीबांसाठी 1 लाख 70 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. या पॅकेज अंतर्गत गरजूंना विविध प्रकारची मदत केली जाणार आहे.

माहितीनुसार, भारतात आतापर्यंत 724 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान 18 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 45 रुग्णांची कोरोनाच्या जाळ्यातून सुटका झाली आहे. तसेच 661 रुग्णांवर देशभरातील रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.