Aadhaar Letter, eAadhaar, mAadhaar आणि Aadhaar PVC Card मध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या
Aadhaar Card (File Photo)

लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांसाठी आधार कार्ड (Aadhaar Card) हे महत्त्वपूर्ण आणि अनिवार्य ओळखपत्र आहे. सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी, नवे बँक अकाऊंट ओपन करण्यासाठी, शाळेतील अॅडमिशन करता इत्यादी कामांसाठी आधार कार्ड अत्यंत गरजेचे आहे. तसंच आधार कार्डवरील माहिती योग्य आणि स्पष्ट असणे देखील तितकेच आवश्यक आहे. अन्यथा महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता आहे. मात्र आधार कार्ड वेगवेगळ्या स्वरुपात उपलब्ध असल्याने त्याबद्दल अनेकांच्या मनांत शंका असतात. त्याबद्दल जाणून घेऊया... (Aadhaar-PF Account Linking: आधार कार्ड पीएफ अकाऊंटशी UMANG App, EPFO Portal आणि ऑफलाईन पद्धतीने कसे लिंक कराल? जाणून घ्या)

आधार कार्ड Aadhaar Letter, eAadhaar, mAadhaar, Aadhaar PVC Card स्वरुपात उपलब्ध आहे. युआयडीएआय नुसार हे सर्व पूर्णपणे वैध असून स्वीकारार्ह आहे, अशी माहिती UIDAI ने ट्विटद्वारे दिली आहे. त्यामुळे नागरिक आपल्या सुविधेनुसार आधार कार्ड कोणत्याही स्वरुपात वापरु शकतात.

पहा ट्विट:

आधार कार्ड हे सामान्यत: युआयडीएआय द्वारा जनरेट केले जाते आणि त्याची कॉपी तुमच्या घरी पोस्टाद्वारे पाठवली जाते. हे आधार कार्डचे स्वरुप सुरुवातीपासून वापरले जात आहे. eAadhaar हे ऑनलाईन आधार कार्डची प्रत असून याची तुम्ही ऑनलाईन प्रिंट घेऊ शकता आणि ही प्रिंट आधार कार्ड म्हणून व्हॅलिड मानली जाते. mAadhaar हे डिजिटल स्वरुपाचे आधार असून तुमच्या मोबाईलवर या आधाराची डिजिटल कॉपी स्टोअर केली जाते. कुठेही आधार कार्डची मागणी केल्यास मोबाईलमधील mAadhaar तुम्ही दाखवू शकता. Aadhaar PVC Card हे एका क्रेडिट किंवा डेबिट कार्ड सारखे असून यावर तुमचे सर्व आधार डिटेल्स, QR कोड आणि होलोग्राम असतो.

आधार कार्ड किंवा कोणत्याही सामान्य कागदावर आधार डाऊनलोड केलेली आवृत्ती ही सर्व वापरकर्त्यांसाठी पूर्णपणे वैध आहे. जर एखाद्या व्यक्तीकडे कागद आधार कार्ड असेल तर त्याचे आधार कार्ड लॅमिनेट करणे किंवा पैसे देऊन स्मार्ट कार्ड मिळवण्याची आवश्यक नाही.

आधार कार्ड हरवल्यास https://eaadhaar.uidai.gov.in वरून विनामूल्य डाऊनलोड करु शकतात. डाऊनलोड केलेले आधार कार्ड यूआयडीएआयने पाठविलेल्या मूळ आधार कार्डाइतकेच वैध आहे.