पीएफ अकाऊंट (PF Account) मधून पैसे काढण्यासाठी किंवा ट्रान्सफर करण्यासाठी आधार कार्ड (Aadhaar Card) पीएफ अकाऊंटशी संलग्न असणे गरजेचे आहे. त्यासाठी कर्मचार्यांची भविष्य निर्वाह निधी संस्थेने पॅन-पीएफ लिकिंग किंवा युनिव्हर्सल अकाऊंट नंबरशी आधार कार्ड जोडण्याचा पर्याय दिला आहे. हे काम तुम्ही UMANG App, EPFO Portal आणि ऑफलाईन पद्धतीने देखील करु शकता. तर जाणून घेऊया याबद्दल सविस्तर. (Aadhaar Card शी लिंक असलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी विसरलात? या सोप्या स्टेप्सने करा Verify)
उमंग अॅपद्वारे तुम्ही आधार कार्ड UAN नंबरशी जोडू शकता. तर EPFO पोर्टलवरु तुम्हाला आधार नंबर आणि पीएफ अकाऊंट लिंक करता येईल. तसंच ऑफलाईन पद्धतीने देखील तुम्ही हे काम करु शकता. जाणून घेऊया सोप्या स्टेप्स:
UMANG App चा वापर करुन आधार कार्ड पीएफ अकाऊंटला कसे लिंक कराल?
मोबाईलमध्ये UMANG App डाऊनलोड करा.
अॅप ओपन करा आणि EPFO Link वर क्लिक करा,
त्यानंतर "eKYC Services" वर टॅब करा.
"Aadhaar seeding" ऑप्शनवर क्लिक करा.
UAN नंबर एंटर करा.
आधार कार्ड डिटेल्स अॅड करा.
UAN सोबत रजिस्ट्रर असलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला OTP येईल.
OTP चा वापर करुन व्हेरिफिकेशन करा. त्यानंतर तुमचं आथार कार्ड UAN नंबर किंवा पीएफ अकाऊंटला लिंक होईल.
EPFO Portal द्वारे आधार कार्ड आणि UAN नंबर लिंक करण्यासाठी स्टेप्स:
EPFO ची अधिकृत वेबसाईट www.epfindia.gov.in ला भेट द्या.
त्यानंतर होमपेजवरील "eKYC Portal" वर क्लिक करा.
"Link UAN Aadhaar" या ऑप्शनवर क्लिक करा.
UAN रजिस्ट्रर मोबाईल नंबरवर तुम्हाला OTP येईल.
त्यानंतर आधार कार्ड किंवा UIDAI नंबर एंटर करा.
दुसरा ओटीपी आधार लिंक मोबाईल नंबर किंवा ईमेलवर येईल.
OTP व्हेरिफाय करा आणि UAN आधारसोबत लिंक होईल.
तुम्ही ऑफलाईन पद्धतीने देखील हे काम करु शकता. यासाठी तुम्हाला EPFo च्या शाखेला भेट द्यावी लागेल. त्यानंतर "Aadhaar Seeding Application Form भरुन द्यावा लागेल. त्यासोबत UAN, PAN आणि आधार कार्डच्या स्वत: स्वाक्षरी केलेल्या कॉपीज जोडाव्या लागतील. त्याचे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचे आधार कार्ड पीएफ अकाऊंटला लिंक होईल.