Aadhar Card (Photo Credits: PTI)

आधार कार्ड (Aadhaar Card) एक महत्त्वपूर्ण ओळखपत्र आहे. देशातील बहुतांश लोकांकडे आधारकार्ड आहे. अनेक महत्त्वाच्या कामांसाठी आधार कार्डची आवश्यकता भासते. यामुळे अनेक कामे अगदी सहज पूर्ण होतात. त्यामुळे आधार कार्ड अपडेट असणे गरजेचे आहे. म्हणूनच UIDAI देखील वेळोवेळी आधार कार्ड धारकांना चांगल्या सुविधा प्रदान करण्यासाठी नवे फिचर्स सादर करते. यामुळे आधार कार्डची उपयुक्तता आणि सुरक्षा यात वाढ होते. (e-Aadhaar Card आता कधीही आणि कुठेही डाऊनलोड करण्याची सोय; UIDAI ने शेअर केली 'ही' डिरेक्ट लिंक)

अनेकदा आधार कार्ड अपडेट न झाल्याने समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुमच्या आधार कार्डला चुकीचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी लिंक असेल तर समस्या वाढू शकतात. परंतु, घाबरुन जाण्याचे काही कारण नाही. तुम्ही तुमच्या जवळच्या आधार सेंटरवर जावून ते अपडेट करुन घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला 50 रुपये शुल्क आकारण्यात येईल.

आधार कार्डमध्ये मोबाईल नंतर नेहमी अपडेट ठेवणे योग्य ठरेल. तुम्हाला आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडी लिंक आहे, हे जाणून घ्यायचे असल्यास या स्टेप्स फॉलो करा.

# सर्वप्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जा किंवा या

(https://resident.uidai.gov.in/verify-email-mobile) डायरेक्ट लिंकवर क्लिक करा.

# त्यानंतर 12 अंकी आधार नंबर, मोबाईल नंबर आणि ईमेल आयटी टाकून Captcha टाईप करा.

# व्हेरिफाय करण्यासाठी OTP वर क्लिक करा.

# जर तुम्ही इंटर केलेला मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी चुकीचा असेल तर तुम्हाला स्क्रीनवर हा मेसेज दिसेल- The Mobile Number You Had Entered Does Not Match With our Records.

आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी अपडेट नसल्यास तुम्हाला आधारकार्ड संबंधित ऑनलाईन सेवांचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे या सोप्या स्टेप्स वापरुन आताच तुमची शंका दूर करा.