पॅन कार्ड (Photo Credits: File Photo)

तुम्ही PAN कार्डवर 10 अंकांचा एक कोड जरुर पाहिला असाल त्याला 'पॅन कार्ड क्रमांक' (PAN Card Number) म्हणून संबोधले जाते. मात्र पॅन कार्डवरील क्रमांक सामान्य नसून तो पॅनकार्ड धारकासंबंधित अधिक माहिती देतो. युटीआय आणि एनएसडीएल यांच्या माध्यमातून पॅन कार्ड देण्यात येणाऱ्या आयकर विभागाकडून एक विशेष प्रक्रियेचा उपयोग केला जातो. पॅन कार्डवरील क्रमांक हा अंक आणि अक्षर यांच्यापासून तयार करण्यात येतो. यामधील पहिले पाच कॅरेक्टर नेहमीच अक्षर असतात आणि उर्वरित 4 कॅरेक्टर अंकांमध्ये असतात. तर शेवटी एक अक्षर पुन्हा देण्यात येते.

त्यामुळे पॅन कार्डवरील क्रमांकामध्ये व्यक्तीसंबंधित कोणती माहिती देण्यात येते हे माहिती असणे फार महत्वाचे आहे. कारण जर तुमच्या पॅन कार्डमध्ये 'ओ'(O) आणि शून्य (0) असल्यास ते तुम्हाला पटकन ओळखता येणार नाही. मात्र जर तुम्हाला पॅन कार्डवरील क्रमांक आणि अक्षरांबाबत माहिती असल्यास याबाबत समजणे सोपे जाईल.

तुमच्या पॅन कार्डवरील पहिले पाच अक्षरातील पहिली तीन अक्षर ही अल्फाबेटिक सिरिज दर्शवतात. पॅन कार्डवरली चौथा कॅरेक्टर तुम्ही आयकर विभागाच्या दृष्टीने कोण आहात हे सुचित केले जाते. जर तुम्ही Individual आहात तर तुमच्या पॅन कार्डवरील चौथे अक्षर P असेल. तर जाणून घ्या अन्य अक्षरे तुमच्या बाबत कोणती माहिती दर्शवतात.(Aadhar-Pan Card लिंक करण्यासाठी 31 डिसेंबर 2019 पर्यंत मुदतवाढ)

>C- कंपनी

>H- हिंदू अविभाजित परिवार

>A- व्यक्तींचा संघ (AOP)

>B- बॉडी ऑफ इंडिविजुअल्स (BOI)

>G- शासकीय कंपनी

>J- आर्टिफिशिअल ज्युडिशियल पर्सन

>L-लोकल अथॉरिटी

>F- फर्म/लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप

>T- ट्रस्ट

यानंतर पॅन कार्डवरी पाचवे अक्षर तुमच्या आडनावामधील पहिले अक्षर दर्शवते. अर्थात जर तुमचे आडनाव गुप्ता असल्यास पॅन कार्डवरील पाचवे अक्षर G असणार आहे. तर नॉन इंडिविज्युअल पॅन कार्ड धारकांचे पाचवे अक्षर तुमच्या नावाचे पहिले अक्षर दर्शवते. पुढील चार क्रमांक हे 0001 ते 9990 दरम्यान असतात. त्यानंतर तुमच्या पॅन कार्डवरी शेवटचे कॅरेक्टर हे नेहमीच एक अक्षर असते.