Income Tax (Photo Credits: Pixabay.Com)

Income Tax 2019: मोठ्या मेहनतीने कमावलेले पैसे 'इन्कम टॅक्स' (Income Tax) खाली भरावं लागणं ही सगळ्यात कठीण गोष्ट असते. पण तुम्ही पैसे कमावण्यासाठी जशी मेहनत घेताय तसेच तुम्ही त्याचा योग्य रित्या वापर आणि सेव्हिंग करू शकलात तर विनाकारण इन्कम टॅक्सखाली तुमचे पैसे जाणार नाहीत. अनेकदा पैसे वाचवण्यासाठी टॅक्स भरणं टाळलं जातं पण हा एक प्रकारचा गुन्हाच आहे. म्हणूनच पैसे वाचवायचे असतील तर योग्य रित्या त्याचं नियोजन करणं आवश्यक आहे. प्रत्येक नवं आर्थिक वर्ष एप्रिल महिन्यापासून सुरू होते. त्यामुळे पुढील वर्षाचा टॅक्स वाचवायचा असेल तर आजच हे सहा मार्ग जाणून घ्या.  सर्वसामान्यांना मोदी सरकार लवकरच देणार गूड न्युज! करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 5 लाख होणार?

टॅक्स वाचवण्याचे हमखास आणि सुरक्षित उपाय -

  • शिक्षणावर खर्च

मुलांच्या शिक्षणावर होणारा खर्च तुम्ही वर्षाच्या शेवटी टॅक्समधून रिबेट मिळवण्यासाठी वापरू शकता. पहिल्या दोन मुलांच्या शिक्षणावर होणार्‍या खर्चावर सरकार टॅक्समध्ये सूट देते. सर्वाधिक लाखभर रूपयांपर्यंत सूट मिळू शकते. यामध्ये प्रायव्हेट ट्युशन, कोचिंग फी, डोनेशन, डेव्हलपमेंट चार्ज यांचा समावेश होतो. उच्च शिक्षणासाठी कर्ज घेतले असल्यास त्याचादेखील फायदा मिळू शकतो. खुशखबर! Income Tax Return रिफंड प्रक्रीया आता एका दिवसात होणार

  • EPF मध्ये गुंतवणूक

EPF मध्ये गुंतवणूक केल्यासही फायदा होऊ शकतो. सरकारी कर्मचार्‍यांची दरमहा विशिष्ट रक्कम EPF मध्ये जमा केली जाते. ही एका प्रकारची सेव्हिंग असते. या रक्कमेवरही सूट मिळू शकते.

  • गृहकर्ज

तुम्ही थेट रक्कम देऊन घर विकत घेण्यापेक्षा ते कर्जाच्या स्वरूपात दाखवल्यास तुम्हांला इन्कम टॅक्समध्ये फायदा मिळू शकतो. बॅंकेकडून कर्ज घेतलेले असल्यास 24B अंतर्गत तुम्हांला 2 लाखांपर्यंत सूट मिळू शकते. तसेच घराचे रिनोव्हेशन करण्यासाठी कर्ज घेतले असल्यास 30,000 रूपयांपर्यंतच्या कर्जावर टॅक्समधून सूट मिळू शकते.

  • आरोग्य विमा

आरोग्य विम्याच्या खाली सुमारे 55,000 रूपयांचा टॅक्स वाचवण्यास मदत होते. दरवर्षी आरोग्य विम्याच्या प्रिमियम वर स्वतःला 25,000 आणि पालकांना मेडिकल इन्श्युरंसवर 30,000 रूपयांची सूट देण्यात आली आहे.

  • प्रवासी भत्ता -

प्रतिमहिना 1,600 रूपये प्रवासी भत्ता असेल तर वर्षभरात सुमारे 19,200 रूपये टॅक्स वाचवला जाऊ शकतो.

  • RGESS योजना-

राजीव गांधी इक्विटी सेविंग स्‍कीम (RGESS)मध्ये 50,000 रुपये गुंतवल्यास तुम्हांला 25,000 रूपयांचीसवलत मिळूशकते.

सध्या 2.5 लाख रूपयांपर्यतच्या वार्षिक उत्पन्नावर टॅक्स आकारला जात नाही. आयकर विभाग सध्या 2.5 लाख ते 5 लाख रूपयांच्या उत्पन्नावर 5% कर, 5-10 लाख रूपयांवर 20% कर तर 10 लाखाहून अधिक उत्पन्न असणार्‍यांमध्ये 30% कर आकारला जातो. मात्र भविष्यामध्ये यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.