खुशखबर! Income Tax Return रिफंड प्रक्रीया आता एका दिवसात होणार
ITR | Representational Image | (Photo Credits: PTI)

आयकर रिटर्न (Income Tax Return) भरणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. प्री फाईल टॅक्स रिटर्न फार्म्स आणि आयकर रिटर्न फायलिंगची प्रक्रीया वेगवाग होण्यासाठी सरकार पाऊल उचलत आहे. यासाठी केंद्र सरकारने पुढील वर्षाच्या व्यवस्थेसाठी सुमारे 4,241.9 7 कोटी रुपये मंजूर केले आहेत. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी याबसंदर्भातील माहिती दिली.

त्यामुळे आता आयकर रिटर्न भरल्यानंतर टॅक्स रिफंडसाठी 63 दिवस वाट पाहण्याची गरज नाही. ही प्रक्रिया एका दिवसात पूर्ण व्हावी, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. ही नवी सुविधा सुरु करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर तीन महिन्यांच्या चाचणीनंतर ही नवी प्रक्रीया सुरु करण्यात येईल. या निर्णयामुळे आयकर विभाग आणि करदात्यांना अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत. सर्वसामान्यांना मोदी सरकार लवकरच देणार गूड न्युज! करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 5 लाख होणार?

नव्या प्रक्रीयेमुळे प्राप्तिकर संकलन, विवरपत्र चुकांची दुरुस्ती या प्रक्रिया जलद आणि सुकर होण्यास मदत होईल.